जळगाव :- सध्या महाराष्ट्रात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव शहरात गेल्या महिन्याभरापासून वाढलेल्या चोरीने अगोदरच नागरिक धास्तावले असताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्ह्यातील नामांकीत वाहन व्यावसायिक डी.डी.बच्छाव यांच्या घरावर पिस्तुलधारी दरोडेखोरांनी लूट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, डी.डी.बच्छाव हे पत्नीसह लहान मुलाकडे पुण्याला गेले असल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील नामांकित वाहन व्यावसायिक डी.डी.बच्छाव हे परिवारासह रिंगरोडकडून आयएमआर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या अजय कॉलनीतील बंगल्यात राहतात. बच्छाव सर लहान मुलाकडे पुणे येथे पत्नीसह गेलेले होते. मोठा मुलगा किरण बच्छाव हे शोरूमला होते तर त्यांची पत्नी व मुलगा घरी होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे बच्छाव यांचा नोकर कुत्र्याला घेऊन फिरायला गेला.
नोकर बाहेर पडताच ६ दरोडेखोरांनी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी घरावर धडक दिली. किरण बच्छाव यांच्या पत्नीने दरवाजा उघडताच, एकाने ‘आता बाहेर गेला तो व्यक्ती तुमचा नोकर होता का?’ अशी विचारणा करीत तो बेशुद्ध पडल्याचे सांगितले. तर दुसऱ्याने त्यांचा गळा दाबत मागून हात धरले. योगायोगाने काही मिनिटात किरण बच्छाव देखील घरी पोहचले. दरोडेखोरांनी त्यांचे देखील हात बांधत त्यांना मागील बाजूला घेऊन गेले. घरातील पैसे आणि दागिने कुठे आहेत अशी विचारणा करून त्यांनी मागील दरवाजा उघडण्यास सांगितले. बच्छाव यांनी तो दरवाजा खराब असल्याचे सांगितले.
बच्छाव कुटुंबियांच्या घरातील आवाज ऐकून बाहेरील नागरिक सतर्क होताच दरोडेखोरांनी मागील बाजूने पळ काढला. दरम्यान, घरात ६ दरोडेखोर शिरले होते त्यापैकी दोघांकडे पिस्तूल तर दोघांच्या हातात चाकू असल्याचे समजते. पिस्तूल नकली असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, गृह अधीक्षक श्री.गावीत, एलसीबी निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासह पोलीस पोहचले आहेत. माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि बच्छाव कुटुंबियांचे मित्र मंडळी देखील त्यांची भेट घेत विचारणा करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.