जळगांव :- सध्या महाराष्ट्रात अपघात झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव शहरातील शिवकॉलनी रेल्वे उड्डाणपूलावर भरधाव डंपरने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातात दुचाकीवरील भावंडांपैकी बहिणीचा जागीच मृत्यू झाला. मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे (वय-२० वर्ष) रा. खोटे नगर, जळगाव असे मयत तरुणीचे नाव आहे. तर या दुर्दैवी अपघातात तरुणीचा भाऊ सुदैवाने बचावला आहे. आज दुपारी चार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
राखेने भरलेला एमएच १९ सीवाय ३३११ या क्रमाकांचा डम्पर जळगावकडून धुळ्याकडे जात असताना महामार्गावरील शिव कॉलनी परिसरातील रेल्वे उड्डाणपूलावर या डंपरने भाऊ बहीण जात असलेल्या मोपेड दुचाकीला (एमएच १९ सी ७१६९) मागून जोरदार धडक दिली.
डोक्यावरुन डंपरचे चाक गेल्याने जागीच मृत्यू
यात दुचाकीवरील मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे ही तरुणी रोडवर पडली, तिच्या डोक्यावरुन डंपरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणीचा भाऊ नचिकेत सुभाष सोनवणे (वय २५ रा. खोटे नगर, जळगाव) हा थोडक्यात बचावला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
पोलिसांनी तरुणीचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी राखाने भरलेला डंपर ताब्यात घेतला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
रेल्वे उड्डाणपुलावर घडला अपघात
जळगाव शहरातील शिवकॉलनी रेल्वे उड्डाणपुलावर हा आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जळगावकडून धुळ्याकडे जात असताना महामार्गावरील शिवकॉलनी परिसरातील रेल्वे उड्डाणपूलावर एमएच 19 सीवाय 3311 या क्रमाकांच्या डंपरने मोपेड दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.