तालुका व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा इंदिरा गांधी विद्यालयात संपन्न……

Spread the love


इंदिरा गांधी विद्यालयाचे विद्यार्थ्यांचे स्पर्धेत सुयश

धरणगांव : – क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य ,पुणे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय जळगांव ; व इंदिरा गांधी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यामानाने शासकीय तालुकास्तरीय वयोगट 14/17/19 वर्षातील मुले/मुली व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, धरणगांव येथे आयोजीत करण्यात आल्या होत्या .या स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे पर्यवेक्षक श्री ए.एस. पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंदसिंग यांच्या प्रतिमेला माल्य अर्पण करून करण्यात आली अध्यक्ष स्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस. एस. पाटील होते. “हारने किंवा जिंकणे महत्वाचे नसून पूर्ण ताकदीने लढने महत्वाचे आहे” असा संदेश सौ पाटील यांनी खेळाडुंना दिला.

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत धरणगांव तालुक्यातील सा.दा.कुडे माध्यमिक विद्यालय . बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा ,कला ,वाणिज्य,व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, पी. आर. हायस्कुल, महात्मा फुले हायस्कुल , गुड शेफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल ,या शाळेतील विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता .
या वेळी जिल्हा क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी, विद्यालयाचे संचालक अश्विन पाटील,जितेंद्र ओस्तवाल,फिलिप गावित, एच.डी. माळी , एम डी परदेसी वाय ए पाटील , अमोल सोनार यांच्या सह शहरातील क्रीडा प्रेमी उपस्थित होते.

क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी साई व्हॉलीबॉल क्लब धरणगांव चे अध्यक्ष रवींद्र कंखरे ,म.पो. सुमेर वाघरे , स्वप्नील भोलाने, गौरव भागवत, ईश्वर चौधरी, अनिकेत सोनवणे,वैभव भोलाने,बाळा चौधरी, आकाश कंखरे, यांनी काम पाहिले
या क्रीडास्पर्धा संपन्न करणारे शिक्षक, तसेच मेहनती शिक्षकांचे अभिनंदन व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक चेअरमन डी जी पाटील,व सचिव सी के पाटील यांनी केलेआहे

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.डी.परदेसी यांनी केले तर आभार श्री डी.एन. पाटील यांनी केले.

निकाल :

विजयी संघ:- (19 मुली) इंदिरा गांधी विद्यालय

(19मुली) विजयी संघ :- इंदिरा गांधी विद्यालय,

(17मूल) विजयी संघ :- इंदिरा गांधी विद्यालय,

(17 मुली) पी.आर. हायस्कुल

(14 मुले ) इंदिरा गांधी विद्यालय

(14 मुली) इंदिरा गांधी विद्यालय.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार