विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनीच्या वतीने दिल्ली क्रूर घटनेचा निषेध; तहसीलदारांना निवेदन

Spread the love


पारोळा । प्रतिनिधी :- श्रद्धा वालकरच्या हत्ये संदर्भात दुर्गा वाहिनीच्या जिल्हा संयोजिका विजया राजेश पाटील यांनी विश्व हिंदू परिषदेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत न्याय हक्क आणि कमकुवत कायदा यातून असे गुन्हेगार मोकाट सुटतात यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी करून गुन्हेगारास शिक्षा व्हावी आणि अश्या कृत्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी महिलांना मुलींना सरंक्षण मिळावे.

यासाठी प्रयत्नशील राहील आफताब या गुन्हेगाराने जे कृत्य केले आहे आणि एक निष्पाप मुलीचा जीव घेणारा नराधम प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करून सदर निवेदनाची एक प्रत भारताचे राष्ट्रपती महोदयांना लवकरच पाठविली जाईल. अशा नराधमांना कडक शिक्षा व्हावी लवजिहाद चा खुनी खेळ आणि आंतरधर्मीय विवाहवर बंदी घालावी गुन्हेगारास कठोर शिक्षा विनाविलंब झाल्यास अश्या कृत्यांवर आळा बसेल या उद्देशाने आज तहसीलदार गवांदे यांना निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात आला आहे.

यावेळी विहिंप.दुर्गा वाहिनीच्या तालुका संयोजिका मोनाली भोई व सदस्या मनीषा कुंभार, रुपाली पाटील, अन्नपूर्णा पाटील,निकिता चौधरी, रेखा चौधरी, रोहिणी फंड,मनीषा पाटील, सृष्टी पारधी, मोनिका पवार,तसेच बजरंग दल प्रखंड अध्यक्ष डॉ. रविंद्र धनराळे, प्रखंड मंत्री डॉ. ज्ञानेश्वर पाटील, प्रखंड संयोजक विशाल महाजन,प्रखंड सहसंयोजक गोपाल ठाकुर,प्रखंड आखाडा प्रमुख बाळा पाटील, शहर सहसंयोजक दीपक पाटील, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नितिन बारी यांच्या उपस्थितीत जिल्हा संयोजिका विजया राजेश पाटील यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर केले.

टीम झुंजार