अमळनेर- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एका शाळेत शिक्षण घेणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याने मुलगी गर्भवती राहिली आणि प्रकारातून मुलीने बाळाला जन्म दिला असून याप्रकरणी दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी आरोपी विरुद्ध मारवड पोलीस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवायीन बलात्कार पीडित मुलीने स्वतः फिर्याद दिली असून फिर्यादित म्हटलं आहे की,आरोपी समाधान गुलाब पारधी रां. निंभोरा ता. अमळनेर याने पिडीतेस धमकी देवून सन २०२० ते जुलै २०२२ पावेतो वेळोवेळी निंभोरा ता. अमळनेर गावी पिडीतेचे राहते घरात तिचे आई वडील शेतात कामासाठी गेलेवर व बहीणी ह्या शाळेत गेलेवर पिडीतेशी जबरदस्तीने शारीरिक संबध ठेवुन अत्याचार केल्याने मी त्याचेपासून गर्भवती राहुन तिने एक पुरूष जातीचे बाळास जन्म दिला आहे. सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध भाग ५ सीसीटीएनए स गुरनं. ११२/२ ०२२ भादवि कलम ३७६ (२N), ५०६ अपराधांपासु न संरक्षण अधि, २०१२ कलम ४,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जयेश खलाणे, हे करीत आहे.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम