जळगाव । जळगाव जिल्ह्यात महिलांवर होणारे अत्याचार थांबता थांबत नाही. महिलेवरील अत्याचाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. घरकाम करीत असलेल्या मोलकरणीला जबदरस्तीने पकडत धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना जळगाव शहरात घडलीय. याप्रकरणी पीडीत महिलेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक महिला घरकाम, धुणी, भांडी करण्याचे काम करते. दि.१३ रोजी ती घरात फरशी पुसत असताना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास प्रकाश पुंडलिक पाटील रा.पहूर, ता.जामनेर याने याने पीडीत महिलेला मागून पकडले. महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता तोंड दाबून धमकी देत त्याने महिलेवर अत्याचार केला.
तसेच घडलेल्या प्रकाराबाबत कुणालाही सांगितल्यास महिलेसह मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहेत
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






