शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाचा अनिल बोरनारे यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल (प्रतिनिधी):- शिक्षणक्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विधान परिषदेत शिक्षकांना अपेक्षित असलेला बदल कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात नक्कीच दिसणार असून परिवर्तन शंभर टक्के होणार असल्याचे प्रतिपादन भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केले.
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री बापूसाहेब डी डी विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल अभ्यासकेंद्र व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, मुंबई केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय व्यवस्थापन पदविका व ग्रंथालय पदवी शिक्षणक्रमाचे उदघाटन अनिल बोरनारे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक शिक्षण मंडळाचे चेअरमन धनराज विसपुते व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ सिमा कांबळे व रायगड जिल्ह्यातील दोनशे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
शाळेचे प्रशासन उत्तम चालविण्यासाठी शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम शिक्षकांना मार्गदर्शक ठरणार असून यासाठी शिक्षकांनी नियमित संदर्भ वाचण्याची गरज असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील २० वर्षाचा विचार करून देशाला नवीन शैक्षणिक धोरण दिल. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी १४ हजार ५०० पीएम-श्री स्कुल्स ची घोषणा केली असून आपली शाळा कशी निवडली जाईल याचा शिक्षकांनी विचार करून स्पर्धेत टिकून राहण्याचा सल्ला अनिल बोरनारे यांनी शिक्षकांना दिला.
अध्यक्षीय भाषणात धनराज विसपुते यांनी आदर्श शैक्षणिक समूहाच्या राज्यातील ५५ शाळा व महाविद्यालयाचा आढावा घेऊन पदवीधर बेरोजगारांसाठी संस्थेने अनेक उपक्रम राबविले असून याचा फायदा उत्तर महाराष्ट्रातील हजारो पदवीधारकांना झाला असल्याचे सांगून संस्था लवकरच फिनलँड देशातील शिक्षण व्यवस्थेशी सामंजस्य करार करणार असून त्याचा फायदा राज्यातील शिक्षण व्यवस्थेला होणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ सिमा कांबळे यांनी केले.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.