औरंगाबाद : – सध्या देशात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच दिल्लीतील श्रद्धा हत्या प्रकरण सध्या देशभर गाजत आहे, यादरम्यान महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे प्रियकराने स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याची थरारक घटना आज दुपारी २ वाजेच्या दरम्यान पहाडसिंग पुरा परिसरात घडली. यात दोघे गंभीररित्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरु आहेत. गजानन मुंडे आणि पूजा साळवे अशी प्रेमीयुगुलाचे नाव आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील झुलॉजी विभागात दोघांचा परिचय झाला. पूजा साळवेचे येथेच पीएचडी पूर्ण झाली असून ती सध्या फॉरेनसिक सायन्स महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तासिका तत्वावर कार्यरत आहे. तर गजाजनची पीएचडी सुरु आहे. अनेक दिवसांपासून दोघांत प्रेम संबंध होते. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद झाला होता. यातूनच ही घटना झाल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी प्रयोगशाळेत असताना विद्यार्थी दुचाकीवर आला. त्याने ती प्रयोगशाळेत तिच्या मार्गदर्शक महिला प्राध्यापकांशी संवाद साधत असताना त्याने सोबत आणलेले रॉकेल तिच्या अंगावर टाकले. या भीतीने प्राध्यापक व ती मुलगी बाहेर पळत आली. त्याने तिला पेटवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तिचा चेहरा जळाला असून मुलगाही भाजला आहे. शासकीय विज्ञान संस्था येथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीच्या अंगावर व स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आग लावल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली. मुलाचे नाव गजानन मुंडे असे आहे.
जळालेल्या अवस्थेत असलेल्या दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सदर मुलीने लग्नास नकार दिला या कारणावरून गजानन मुंडे यांनी पूजा साळवे हिच्या सोबत स्वतःला आग लावून घेतली अशी माहिती बेगमपुरा पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा जबाब नोंदवणे सुरू असून तिला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन्ही विद्यार्थी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन करत असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित मुलगी ही बायो फिजिक्स अभ्यासक्रमाची विज्ञान संस्थेतील माझी विद्यार्थीनी आहे. या घटनेमुळे विद्यापीठ आणि शासकीय विज्ञान संस्थेत खळबळ उडाली आहे. उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये ही भीतीचे वातावरण आहे. संबंधित विद्यार्थ्यांनीवर प्रेम प्रकरणातून हल्ला केला की तर इतर काही कारण आहे. याबाबत पोलिस तपास घेत आहेत.
तिने माझा वापर केला :
पूजाने माझा वापर केला, आता ती माझ्याशी लग्न करत नाही. तिने माझा वापर केला असा आरोप गजानन याने केला आहे. यातूनच तो पूजा शिकवत असलेल्या महाविद्यालयात गेला . येथे स्वतःला पेटवून घेत पूजाला त्याने मिठी मारली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पूजाने पोलीस स्टेशनमध्ये गजानन आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार दिली असल्याची माहिती आहे.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.