100कप सिरप,मास्क सॅनिटायझरसह ७ खुर्ची भेट;दीपक सोनार यांचे दातृत्व
प्रतिनिधी विशाल महाजन झुंजार वृत्तसेवा
पारोळा:- येथील कुटीर रुग्णालयाचे आरोग्यसेवक दीपक सोनार यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला.वाढदिवशी गोरगरिबांना १०० कप सिरप,१०० सॅनिटायझर,५०० मास्कचे वाटप केले सोबतच कुटीर रुग्णालयास ७ फायबर खुर्ची आणि २ फायबर बकेट भेट दिली आहे.परिणामी या आदर्शवत उपक्रमाचे कौतुक होत आहे.
आरोग्य सेवक दीपक सोनार हे दरवर्षी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जोपासून साजरा करत असतात त्याचाच भाग म्हणून यंदाही कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेवून गोरगरीब महागडे सॅनिटायझर मास्क कप सिरप घेऊ शकत नाहीत या भावनेने त्यांनी तब्बल १०० गोरगरिबांना ब्रॅंडेड कंपनीचे आरोग्यवर्धक किटचे वाटप केले आहे.
समाजाचे काही देणं लागतो या भावनेतून दरवर्षी लोकोपयोगी वस्तूचे वाटप करीत असतो गतवर्षी मतिमंद मुलांच्या शाळेत अन्नदान केले होते या अश्या सामाजिक उपक्रमातूनच आत्मिक समाधान मिळत असल्याचे दीपक सोनार यांनी ‘तरुण भारत’शी बोलतांना सांगितले. दरम्यान आरोग्य वर्धक किटचे वाटप करतेवेळी वैद्यकीय अधिकारी डाँ.योगेश साळुंखे, डॉ प्रशांत सोनवणे,डॉ गौरव कोतकर,मनन संस्थेचे अध्यक्ष विशाल महाजन, सरला पवार,मंगलबाई त्रिवेणी,अभीजीत पाटिल,प्रसाद राजहंस,अजय घटायडे,नामदेव आहीरे,बबन माळी,रमेश पाटिल,विकी लोहरे, सागर बधान,रोशन पाटिल,ईश्वर ठाकुर,रोहीत पाटिल,प्रेम वानखेडे,रिंकु शेलार,राहुल पाटिल बंटी चौधरी,रोहन लोहरे,जयदेव चौधरी,विकी देशमुख,गोलू चौधरी उपस्थित होते.