प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :-येथे दिनांक 22 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय येथे 39 रूग्णांचे अंतिजन टेस्ट घेण्यात आली यामध्ये एरंडोल शहरातील 10, व ग्रामीण भागातील 12 असे तालुक्यातील एकूण 22 रुग्णाच्या अहवाल पॉझिटिव आढळून आला आहे.
आढळून आलेल्या रूग्णांमध्ये एरंडोल शहरातील पांडव वाडा परिसरातील 30 वर्षीय पुरुष, माळी वाडा परिसरातील 18वर्षीय युवती, 46 व 29 वर्षीय पुरुष,बेलदार वाडी परिसरातील 74 वर्षीय पुरुष
,लक्ष्मी नगर परिसरातील 11 वर्षीय मुलगा,महात्मा फुले पुतळा परिसरातील 56 वर्षीय पुरुष, गांधी पुरा परिसरातील 12 वर्षीय मुलगी,बालाजी मढी परिसरातील 26 वर्षीय,विद्या नगर परिसरातील 48 वर्षीय पुरुष तसेच ग्रामीण भागातील पातरखेडा येथील 12 वर्षीय मुलगा व 19 वर्षीय युवती, मुसळी ता धरणगाव येथील 65 वर्षीय पुरुष,खेडगाव येथील 39 वर्षीय महिला,व 19 वर्षीय युवती,पिंप्री प्र. चा.21 वर्षीय युवक,सोनबर्डी येथील 39 वर्षीय पुरुष,विखरण येथील 17 वर्षीय युवती, सारवे येथील 9 वर्षीय मुलगी,पिंपळकोठा येथील 18 वर्षीय युवक,जवखेडे खुर्द 26 वर्षीय पुरुष,कासोदा येथील 1असे एरंडोल तालुक्यातून एकूण 22 रुग्णांचा अहवाल कोरणा पॉझिटिव आढळून आला आहे.