राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र सैनिक महाराष्ट्र परिक्रमा सायकल मोहिमेवर
जळगाव : छात्र सैनिकांची २२०० कि.मी. सायकल मोहीम चा महापौर सौ जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला
२२/११/२०२२ “राष्ट्रीय छात्र सेनेचे स्थापना आणि आझादी का अमृत महोत्सवाच्या 75 गौरवशाली वर्षांच्या स्मरणार्थ, १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन जळगाव येथे ग्रुप मुख्यालय, अमरावती यांच्या नेतृत्वाखाली महापरिक्रमा नावाची मेगा सायकलिंग मोहीम राबवत आहे.
राष्ट्र तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या उभारणीत तरुणांनाचे योगदान सर्वोत्तम आहे. या तारुण्यात चारित्र्य, साहस, नेतृवास आकार देण्यासाठी आणि शारीरिक सहनशक्ती विकसित करण्यासाठी महाराष्ट्र एन.सी.सी डायरेक्टरेट च्या विशेष प्रोत्साहनाने ही सायकल मोहीम देशातील तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सायकलिंग मोहीम आयोजित करण्यात आलीली आहे. यात छात्र सैनिक सुमारे २२०० किलोमीटरचे अंतर पार करतील. यात विशेष म्हणजे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोका असलेली बाब म्हणजे चुकीची माहिती समाजात पसरवण्यापासून रोकण्यासाठी (Against Disinformation) छात्रसैनिक या मोहिमेत प्रत्येक शहरात, महाविद्यालयात, शाळांमध्ये या विषयावर पथनाट्य सदर करून जनजागृती देखील करणार आहेत.
छात्र सैनिकांची ही सहसाबरोबर राष्ट्रीय सुरक्षेची भावना समाजास प्रेरणा देणारी ठरणार आहे.”
महापरीक्रमेविषयी प्रशासकीय योगदान : अमरावती ग्रुपचे प्रमुख ब्रि. शंतनू मयंकर या मोहिमेचे संपूर्ण नियंत्रक म्हणून असतील. ११ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअनचे समादेशक अधिकारी कर्नल सी पी भाडोला या मोहिमेचे अधिकृत नेतृत्व करतील तर १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन, जळगाव चे लेफ्ट. कर्नल पवन कुमार, प्रशाकीय अधिकारी हे देखील मोहिमेत विशेष आयोजक म्हणून योगदान देत आहेत.
मोहिमे सविस्तर माहिती : राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र सैनिक (सिनिअर डिव्हीजन) दि. २४ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर २०२२ दरम्यान जळगाव येथून सुरुवात करतील. यात अमरावती, नागपूर, नांदेड, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि शेवटी पुणे असा हा प्रवास असणार असून महाराष्ट्रातील एन.सी.सी च्या सर्व विभागीय कार्यालयांना भेट देऊन महाराष्ट्रभर सायाकालीद्वारे परिक्रमा करणार आहेत.या मोहिमेत मूळजी जेठा महाविद्यालयाचे ४, एन.एम. कॉलेज चे ३, बाहेती कॉलेजे चे २ तर अकोला येथील १ छात्र सैनिक या मोहिमेत सहभागी होणार आहेत. तर या मोहिमेत एन.सी.सी अधिकारी कॅप्टन (डॉ.) योगेश बोरसे, लेफ्ट. गौतम भालेराव, लेफ्ट. शिवराज पाटील यात मोहिमेत योगदान देणार आहेत. तसेच बटालिअन चे बी.एच.एम. तात्या काकलीज हे सोबत असणार आहेत. मोहिमेसाठी १८ महाराष्ट्र बटालिअनचे बॅक अप वाहन कॅंटर असणार आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.