मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बदलत्या तंत्रज्ञानातील अद्यावतपणाचे आकलन विद्यार्थ्यांना व्हावे, यासाठी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक सहाय्य विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली.यावेळी या क्षेत्रातील दिग्गज आस्थापने असलेले केपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, आयबीएम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले पायथन आणि एसक्यूएल याबाबतची माहितीदेखील विद्यार्थ्यांना देण्यात आली.
तसेच व्यावसायिक क्षेत्रातील अनेक बाबीदेखील समजून घेता आल्या.यात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विभागातील एकूण ७८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना कंपनीकडून प्रमाणपत्रे देण्यात आली. त्याचा उपयोग या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटच्या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात होतो.
संस्थेचे सेक्रेटरी अॅड. आप्पासाहेब देसाई, अध्यक्ष नंदकुमार काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संचालक प्रा. अशोक चव्हाण, नियुक्ती अधिकारी स्वप्निल देसाई, विभागप्रमुख डॉ. रईस मुल्ला, डॉ. प्रदीप माने आणि डॉ. प्रमोद भावार्थे यांनी परिश्रम घेतले.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.