एरंडोल शहर प्रतिनिधी
एरंडोल: -आज दि.२३/०१/२०२२ रोजी पराक्रम दिनी एरंडोल नगर पालिकेतर्फे लोकसहभागातून अंजनी नदी स्वच्छता मोहिमेची सुरुवात कासोदा रोड पुलापासून करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमात न. प. मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री विकास नवाले यांचे मार्गदर्शन खाली सर्व न. प. कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर कामास प्रारंभ केला आहे. यामध्ये नदीतील गाळ मशिनी द्वारे काढण्यात येत असून किनारी परिसर देखील आरोग्य कर्मचारी द्वारा स्वच्छ करण्यात येत आहे.
आज पहिल्याच दिवशी ४० ट्रॅक्टर गाळ व ८ ट्रॅक्टर कचरा काढण्यात आला.तसेच नदी काठावर वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदर मोहिमेस पर्यावरण दूत म्हणून सन्मानित केलेले डॉ.साळुंखे व डॉ.पवार यांनी देखील आपला सहभाग नोंदवला. तरी शहरातील सर्व नागरीक ,सर्व शासकीय कार्यालये, अधिकारी, कर्मचारी,पत्रकार बांधव, शिक्षक वृंद,सामाजिक मंडळ,तालीम मंडळे,सामाजिक कार्यकर्ते,एनजीओ यांनी देखील एरंडोल नगर पालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या या मोहीमेत सहभागी व्हावे.
लोकसहभागातून अंजनी नदी स्वच्छता व नदी काठी वृक्ष लागवड मोहीम दि.23 जाने ( पराक्रम दिन) ते 26 जाने (प्रजासत्ताक दिन ) 2022 सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत चार दिवस आयोजित करण्यात आली आहे. तरी एरंडोल शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व इतरांनाही प्रोत्साहन द्यावे ही विनंती.
असे आवाहन
विकास नवाळे मुख्याधिकारी तथा प्रशासक एरंडोल नगर पालिका यांनी केले आहे