भडगाव : – सध्या महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील विवाहिता कोठली रस्त्यावरील ओमशांती केंद्र परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली असून, या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही विदारक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने वेगाने तपासचक्रे फिरवली आहेत.चाळीसगाव रस्त्यावरील मयुरेश मार्बलच्या मागील भागातील रहिवासी असलेली विवाहिता बुधवारी (ता. २३) दुपारी दोनच्या सुमारास चाळीसगाव रस्त्यालगत असलेल्या कॉलनी भागात राहणाऱ्या भावाकडे जाऊन येते, असे सांगून घरातून गेली.
त्यानंतर पाच ते पावणेसहाच्या दरम्यान ही महिला कोठली रस्त्यालगत असलेल्या ओमशांती केंद्राच्या मागील बाजूस जळालेल्या अवस्थेत आढळून आली. कॉलनी भागालगत शेतात असलेल्या सालदाराचे या महिलेकडे लक्ष गेले. त्यानंतर हे प्रकरण समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.त्यानंतर त्या महिलेकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या घरी निरोप देण्यात आला. कुटुंबीय तेथे पोचल्यानंतर महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, तेथून जळगाव येथील एका खासगी दवाखान्यात हलविण्यात आल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. ही महिला ५० ते ७० टक्के भाजल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, ‘त्या’ महिलेचा जबाब घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, भडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक उतेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली आहे.त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले, की या महिलेचा जबाब घेण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पालकर यांना जळगाव येथे पाठविण्यात आले आहे. त्यांचा जबाब काय येतो? त्यानंतर गुन्हा दाखल येईल. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.