कपाशी व तुरीच्या पिकाआड गांजाची शेती; ४६ लाख रुपये किंमतीची २०० झाडे जप्त

Spread the love

पाचोरा :- सध्या महाराष्ट्रात अवैध रीत्या गांजा तस्करीचे प्रमाण वाढतच चालली आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एका शेतातील कपाशी व तुरीच्या पिकाआड लावण्यात आलेली गांजाची २०० झाडे जप्त करण्यात आली. याची बाजारात किंमत ४६ लाख रुपये आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. सावखेडा ता. पाचोरा शिवारात बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

सुभाष बाबूराव पाटील (५९) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सावखेडा ता. पाचोरा शिवारातील शेतात त्याने गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी बुधवारी रात्री तिथे लागलीच छापा टाकला. त्यावेळी शेतात गांजाची २०० झाडे आढळून आली. याची किंमत ४६ लाख रुपये इतकी आहे. याबाबत सुभाष पाटील याच्याविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक महेंद्र वाघमारे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार