सर्व गुणांनी परिपक्व आहे तुम्ही रांगोळीच्या माध्यमातून मने जिंकली तुम्ही हीच तुमची कलाकारी सर्वगुणसंपन्न तुम्हीच सौ सुवर्णा पाटील.

Spread the love

एक नारी रांगोळीच्या माध्यमातून देवदेवतांचे हुबेहूब कृती काढण्यात भारी

झुंजार न्यूज व्यक्तिमत्व विशेष शब्दांकन:-अनिल आबा येवले


पाचोरा येथील सौ सुवर्णा पाटील या एक शिक्षिका असून त्यांना लहानपणापासून रांगोळी काढण्याची आवड होती तसा तो छंद आज परत चालू आहे.पाचोरा येथील शिक्षिका सौ सुवर्णा विठ्ठल महाजन यांना रवींद्रनाथ टागोर सेवा रत्न पुरस्कारमिल सौ.सावित्रीबाई परशराम शिंदे शाळेतील शिक्षिका श्रीमती सुवर्णा विठ्ठल महाजन(सौ.सुवर्णा जितेंद्र पाटील)यांना मानम फाऊंडेशन आंध्रप्रदेश व नाथनायग्रुप तामिळनाडू यांच्या तर्फे संयुक्तरित्या “रवींद्रनाथ टागोर सेवा रत्न*” पुरस्कार बहाल करण्यात आला,श्रीमती सुवर्णा पाटील यांनी रांगोळीकला क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल हा पुरस्कार मिळाला.

दरवर्षी हा पुरस्कार नामवंताना दिला जातो.सध्या कोरोना परिस्थिती पाहता हा पुरस्कार online मिळाला.सौ. सुवर्णा पाटील यांना आत्तापर्यंत *गिरणा गौरव प्रतिष्ठान नाशिक चा साने गुरुजी आदर्श शिक्षिका पुरस्कार*,धुळे वेल्फेअर असोसिएशनचा, *आदर्श कलाध्यापक पुरस्कार*,अजिंठा आर्ट अकादमी सांगोला *कलाश्री पुरस्कार*, *क्षितिज फाऊंडेशन मुंबईचा असपायरिंग वूमन 2020 पुरस्कार* असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत,सुवर्णा पाटील यांनी आत्ता पर्यंत रांगोळी या माध्यमातून मतदान जनजागृती ,ग्राम स्वच्छता अभियान जनजागृती,कोरोना जनजागृती,शाहिद जवान श्रद्धांजली रांगोळी,मराठी राजभाषा दिन, दसरा दिवाळी शुभेच्छा,मराठी नववर्ष स्वागत,बेटी बचाओ बेटी पढाओ,अशा विविध सामाजिक रांगोळ्या या पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक,छ. संभाजी राजे चौक,रेल्वे स्टेशन,बस स्टॅण्ड,पाचोरा न्यायालय,पोलीस स्टेशन,शाळा,कॉलेज चौक अशा विविध सार्वजनिक ठिकाणी स्व खर्चाणे,कधी कधी विविध संस्थेच्या माध्यमातून रांगोळ्या काढून जनजागृती व संदेश दिले,त्यानी रांगोळी सोबतनृत्य, गायन ,अभिनय यातही खूप बक्षिसे मिळवली आहेत,जळगाव येथे झालेल्या *सम्राज्ञी खान्देशची 2020 या स्पर्धेत City queen of खान्देश हा किताब मिळाला आहे .

तसेच रांगोळीत व्यक्तिचित्र रांगोळी(पोट्रेट)या प्रकारातही त्यांनी महात्मा गांधी,सरदार पटेल अशा महापुरुषांच्या रांगोळ्या रेखाटल्या आहेत, *जळगाव येथे झालेल्या शिक्षणाची वारी* या विभागीय कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात त्यांनी काढलेल्या रांगोळ्या खूप लोकप्रिय ठरल्या ,या कार्यक्रमाला हजारो शिक्षक व विद्यार्थ्याणी भेटी दिल्या होत्या त्यात त्यांच्या रांगोळ्यांचे खूप कौतुक झाले, बहिणाबाईंची हुबेहूब पोट्रेट रांगोळी आकर्षणाचा विषय ठरली व ,या कलेसोबतच त्या विद्यार्थ्याणसाठी सुंदर हस्ताक्षर छंदवर्ग च्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडवले आहेत ,सध्या देवनागरी मराठी सुलेखन, इंग्रजी सुलेखन(कॅलिग्राफी) *वारली आर्ट अशा विविध कलांचे क्लास कोरोना मुळे प्रत्यक्ष घेता येत नाहीत म्हणून मोबाईच्या माध्यमातून online पद्धतीने विद्यार्थ्यांना कला शिकवत आहेत त्यामुळे त्या मुंबई,पुणे,नाशिक,जालना,जळगाव जिल्ह्यातील,तालुक्यातील विविध विद्यार्थ्यांशी जोडल्या गेल्या आहेत व विद्यार्थ्यांमध्ये कलाप्रिय व आवडत्या शिक्षिका ठरल्या आहेत. ,खूप वर्षापूर्वी त्यांनी ” पाचोरा माय लेडी आयडल “ही स्पर्धा प्रथम क्रमांकाने जिंकली होती. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

.
सौ सुवर्णा पाटील यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जळगाव येथे माननीय श्री जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव जी पाटील व माजी मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते कोरोना योद्धाजळगाव येथील कलेक्टर कार्यालयात सन्मान करण्यात आला होता .अजूनही त्यांचे हे कार्य अविरतपणे चालू आहे,त्यांच्या या कलाक्षेत्रातील कार्याची अनेक सामाजिक संस्था दखल घेत आहेत व त्यांना मार्गदर्शनासाठी देखील आमंत्रित करत आहेत.अलीकडेच त्यांनी व्हाट्सएपच्या ग्रुपच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मॉर्निंग वॉक ग्रुप सुरू केला आहे त्यात जवळपास 50 माहिलांनी सहभाग घेतला आहे व त्यांचे दररोज सकाळी 5 ते 6 एक तास वॉकिंग करतात.असे नवनवीन उपक्रम त्या राबवत असतात.

टीम झुंजार