प्रल्हाद बोंडे यांना भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुरस्कार २०२२ जाहिर

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे


निंभोरा बु।।ता रावेर(वार्ताहर) :-
येथील कृषि तंत्र विद्यालयाचे अध्यक्ष तसेच सामाजिक ,सहकार, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. प्रल्हाद भागवत बोंडे यांना भारतीय दलित साहित्य अकडेमी दिल्ली तर्फे भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुरस्कार २०२२ चा पुरस्कार जाहिर झाला आहे.

सदर पुरस्कार अकादमी चे अध्यक्ष डॉ. एस पी सुमनाक्षर यांनी जाहिर केला आहे. जाहिर झालेला पुरस्कार दिल्ली येथे दि.११ डिसेंबर रोजी देण्यात येऊन गौरव करण्यात येणार आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार