ग्रामीण रुग्णालयात जाऊन केले फळाचे वाटप-
शहर प्रतिनिधी/एरंडोल
आज एरंडोल तालुका व शहर शिवसेना, युवासेना व महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती शिवसेना शहर कार्यालय येथे साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शहरातील ग्रामीण रुग्णालयात जाऊन महिला रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे च्या घोषणा दिल्या.
सदर प्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील यांनी आपल्या भाषणात बाळासाहेबांच्या जीवनपटावर प्रकाश झोत टाकला, शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांनी आपल्या प्रस्तावनेत स्वर्गीय बाळासाहेबांनी शिवसेना महाराष्ट्रात कशाप्रकारे उभी केली याविषयीची माहिती दिली.
कार्यक्रमास शिवसेनेचे महिला गडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, उपजिल्हा संघटक किशोर निंबाळकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, माजी प्रभारी सभापती अनिल महाजन, माजी सभापती मोहन सोनवणे, उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, निराधार समितीच्या सदस्य आनंदा चौधरी, माजी नगरसेवक सुनील चौधरी, सुभाष मराठे, नितीन बिर्ला, संभाजी पाटील, गटप्रमुख छोटू मराठे, चिंतामण पाटील, राजेंद्र ठाकूर, शरद ठाकूर, सुनील मराठे, सुनील चौधरी, साहेबराव पाटील, विलास पाटील, धनंजय खैरणार, विठ्ठल वंजारी, विजय पाटील, संदीप पाटील, योगेश पाटील, चेतन महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल भावसार, प्रभाग प्रमुख कुणाल पाटील, मयूर महाजन, नितीन बोरसे, मोहन महाजन, अतुल मराठे, कृष्णा ओतारी, तुषार शिंपी, प्रवराज पाटील, पिंटू मिस्त्री, आदींनी सहकार्य केले.