जळगाव- ६० लाख रुपये किमतीच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे बनविल्या प्रकरणी पक्की खरेदी असतांना खरेदी केलेल्या मालमत्तांची मागील तारीख दाखवून खोट्या सौदा पावत्या केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विनोद पंजाबराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्यांचे पती जितेंद्र उर्फ रवी बाबुराव देशमुख, अॅड. सुरेखा डी पाटील, अँड. सतीश चव्हाण यांच्यासह ११ जणांविरुद्ध रविवारी दिनांक ४ रोजी जिल्हापेठ पोलिसात मनोज लिलाधर वाणी (वय ४१, रा. जि.प.कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज लिलाधर वाणी यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार त्यांच्या व पत्नी कल्पना अशा दोघांच्या नावावर राजेश घनश्याम पाटील यांना मृत्यूपत्राद्वारे मिळालेली पिंप्राळा शिवारातील मालमत्ता सीटी सर्व्हे गट क्र.७८२१ मधील सामाईक प्लॉट जागा क्षेत्र ८६.६ चौरस मीटर ३० लाखात ३ ऑक्टोबर २०१९ रोजी खरेदी केली आहे. या जागेवर आजही वाणी दाम्पत्याचे वास्तव्य आहे. त्यानंतर रामदास कॉलनीतील १८/२ भाडे तत्वावर घेतलेली इमारत १० वर्षाकरीता भाडे तत्वावर १० हजार रुपये महिना दराने घेतली आहे. राजेश पाटील यांनी नोंदणीकृत खरेदीखत करुन ही मालमत्ता यांनी पती- पत्नी यांना दिलेली आहे.
पक्की खरेदी असताना राजेश पाटील यांनी त्यांचे सहकारी जितेंद्र देशमुख (रा. असोदा, ह.मु.अयोध्या नगर), मिलिंद सोनवणे (रा. नूतन वर्षा कॉलनी), विनिता संजय पाटील (रा. बंगळुरु), लीना रणजित बंड (रा. अमरावती), अनिता नितीन चिंचोले (रा.आदर्श नगर), ॲड. सतीश बी चव्हाण (रा. रामबाग कॉलनी), अॅड. सुरेखा बी पाटील (रा. ख्वॉजामिया चौक) व विनोद देशमुख रा. महाबळ यांनी संगनमत करून ६० लाख रुपये किमतीच्या दोन्ही मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने मागील तारखेचा २०१७ मधील स्टॅम्प पेपर विकत घेऊन बनावट सौदा पावत्या करुन त्या खऱ्या भासविल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.