बीड : – सध्या देशात बरोबरच महाराष्ट्रात देखील स्त्री भ्रूण हत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच बिड जिल्ह्यात यापूर्वी देखील अनेक स्त्री भ्रूण हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. स्वच्छता गृहातील बकेटमध्ये स्त्री जातीचे मृतावस्थेतील अर्भक आढळून आले आहे. बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ही घटना आहे.
रुग्णालयाच्या अपघात विभागामधील स्वच्छतागृहातील पाण्याच्या बकेटमध्ये आज सकाळी हे अर्भक आढळून आले. ज्या बकेटमध्ये हे अर्भक आढळले ती पाण्याने भरलेली होती. त्यामुळे पाण्यात बुडवून अर्भकाला मारले की मृत अर्भक पाण्याच्या बकेटमध्ये टाकले याचा तपास आता पोलीस करत आहेत.
बकेटमध्ये अर्भक टाकून पलायन
घटनेबाबत अधिक माहिती अशी की अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 35 नंबर हा अपघात विभाग आहे. येथे रुग्ण, नातेवाईक यांची मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञाताने अंदाजे दोन दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक येथील स्वच्छता गृहातील बकेटमध्ये टाकून पलायन केले. हे अर्भक ज्या बकेटमध्ये आढळून आले आहे, ती बकेट पाण्याने भारलेली होती. त्यामुळे पाण्यात बुडवून अर्भकाला मारले की मृत अर्भकच पाण्याच्या बकेटमध्ये टाकले याचा तपास आता पोलीस करत आहेत.
स्वच्छता गृहाची सफाई करताना महिला कर्मचाऱ्याच्या निर्देशनास ही बाब आली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. दरम्यान आता पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून हे अर्भक कोणी आणलं? महिला होती की, पुरुष? याचा शोध घेत आहेत.अर्भक मृत होते की, पाण्याच्या बकेट मध्ये बुडवून मारलं?, हे सत्य देखील पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.