धामोरी — वार्ताहर – कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास निधी योजनेअंतर्गत नुकतेच आंबेडकर नगर ते धामोरी वेस कमान या ठिकाणी रस्ता कॉंक्रेटीकरणाचे काम पूर्ण होताच. आता राहिलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत ते धामोरी बस स्टॅंड गटार योजनेचेही काम पूर्णताकडे होत आहे. या विविध विकास योजनांची कामे होत असल्याने धामोरी येथील व्यापारी, व्यवसाय दुकानदार व ग्रामस्थांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे.
या पुढे ही असे विविध विकास योजनेअंतर्गत कामे पूर्ण केले जाईल असे धामोरी येथील लोकनियुक्त सरपंच सौ. जयश्री भाकरे, उपसरपंच प्रभाकर मांजरे ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी एफ. एन. तडवी यांनी केले आहे.