जळगाव : – सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव शहरात एक भिषण अपघात झाला आहे.आपआपली कामे आटोपून घराकडे निघालेल्या मित्रांच्या दुचाकीला भरधाव कारने समोरून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील मित्रांचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी आणि कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना शिरसोली गावाजवळील हनुमान मंदिराजवळ सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. रफिक हुसेन मेवाती (२३) व अरबाज जहांगीर मेवाती (२०, दोन्ही रा. राणीचे बांबरूड,ता. पाचोरा) असे मृत मित्रांचे नावे आहेत. या तरूणांच्या मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त होत होती.
राणीचे बांबरूड येथे रफिक मेवाती हा आई-वडील, तीन भाऊ व बहिणीसह वास्तव्यास होता. तो जळगाव शहरातील मास्टर कॉलनीमध्ये पेरू विक्री करायचा. नेहमीप्रमाणे सोमवारी सुध्दा रफिक मास्टर कॉलनीमध्ये पेरू विक्रीसाठी आला होता. दुसरीकडे त्याचा मित्र अरबाज याने दहा ते पंधरा दिवसांपूर्वी नवीन मिनी ट्रक खरेदी केला होता. त्यामुळे वाहनाच्या कामानिमित्त औरंगाबाद गेला होता. सायंकाळी तो जळगावात परतला. त्यानंतर रफिक आणि अरबाज हे एकाच दुचाकीने (एमएच.१९.सीएच.४३५९) घरी जाण्यासाठी निघाले.
सुसाट कार धडकली अन् दोघं जागीच ठार…
शिरसोली गावाच्या काही अंतरावर असलेल्या हनुमान मंदिराजवळून रफिक, अरबाज हे जात असताना त्यांच्या दुचाकीला पाचो-याकडून शिरसोलीकडे भरधाव येणा-या कारने (एमएच.१९.बीजे.२१७५) समोरून धडकली दिली. अपघात एवढा भीषण होता की, रफिक, अरबाज यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे कारचा पुढील भागाचा चुराडा झाला होता. तर दुचाकीच्या पुढील भागाचे देखील नुकसान झाले होते.
ग्रामस्थांसह पोलिसांची घटनास्थळी धाव…
शिरसोली गावाजवळ अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरसोली ग्रामस्थांसह एमआयडीसी पोलिस ठाण्यातील जितेंद्र राठोड, समाधान टहाकळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर रूग्णवाहिका बोलवून तत्काळ रफिक आणि अरबाज यांना जिल्हा रूग्णालयात नेले. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती दोघांना मृत घोषित केले. यावेळी नातेवाईकांसह ग्रामस्थांची गर्दी झाली होती. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.