जळगाव : – सध्या महाराष्ट्रात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील उचंदा (ता. मुक्ताईनगर) येथील सराफावर हल्ला करून लुटले होते. दरोडेखोरांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह १७ लाख ८० हजारांचा ऐवज लांबविला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग तीन दिवस पाळत ठेवून सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असून, टोळीचा म्होरक्या सुनील जाधव याच्याकडून १२ लाख ८०
उचंदा येथील नीलेश वसंत सोनार (वय ३२, रा. नरवेल, ता. मुक्ताईनगर) सराफ दुकानातील दागिने आणि पैसे घेऊन घराकडे निघाले. नरवेल फाट्याजवळ काळ्या रंगाच्या दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून अलेल्या तिघांनी धारदार शस्त्र लावून नीलेश सोनार यांच्या हाता-पायावर चाकूने वार करून ९ लाखांचे सोने, ८० हजारांची २ किलोचे चांदी, ८० हजारांची रोकड, असा एकूण १० लाख ६० हजारांचा ऐवज लूटून नेला होता.
अप्पर पोलि अधीक्षक चंद्रकांत गवळी, निरीक्षक किसनराव नजनपाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ ते दुकानापर्यंतच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज संकलीत केले व सलग तीन दिवस वेगवेगळ्या पाच पथकांनी माहिती संकलीत केली. सीसीटीव्ही फुटेजच्या अधारावर दरोड्यातील टोळीचा छडा लावला.
सहा साथीदारांची टोळी सुनील मिश्रीलाल जाधव (वय २३, मुळ रा. अंजाळे चिंचखेडा, ता. धुळे, ह.मु. सुप्रीम कॅालनी), प्रकाश वसंत चव्हाण (३०, रा. भिकनगाव खरगोन, ह.मु. सुप्रीम कॉलनी), आकाश दिलीप पवार (२४, रा. लेाणवाणी, ह.मु. सुप्रीम कॉलनी) या तिघांच्या चौकशीत विशाल देविदास मराठे (२३, रायपूर कंडारी), विनोद विश्वनाथ इंगळे (२५, उचंदा ता. मुक्ताईनगर) आणि पाचोऱ्याच्या गुन्ह्यात सहभागी विशाल विजयसिंग बागडे (वय ३०, रा. कंजरवाडा, जळगाव) अशा सहा संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
‘हमाल’ डोक्याची गुन्ह्यांत ‘कमाल’ दरोडेखोरांच्या टोळीचा म्होरक्या सुनील जाधव नावाला साधे हमालीची कामे करतो. मात्र, प्रत्येक वेळेस साथीदार बदलून मोठ्या गुन्ह्यांचे प्लॅनिंग आखत होता. त्यात तो नेहमीच वेगवेगळे साथीदार जुळवून गुन्हे करीत असल्याने पोलिसांना मिळून येत नव्हता.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.