जळगाव : – सध्या महाराष्ट्रात अवैध रीत्या वाळु वाहतूक करणाऱ्याचे प्रमाण वाढतच चालली आहे अश्यातच जळगाव शहरातील अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी आलेल्या महसूल पोलिसांच्या पथकाला पाहून कारवाईच्या भीतीने ट्रॅक्टर सुसाट पळवणाऱ्या चालकाने सात ते आठ जणांना धडक दिली. ही गंभीर घटना मंगळवारी दुपारी जळगाव शहरातील खोटे नगर स्टॉपजवळ घडली. या अपघातात पाच दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला असून पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरू आहे. नदीपात्रात महसूल किंवा पोलिसांचे पथक कारवाईसाठी जाताच वाळूचे डंपर किंवा ट्रॅक्टर चालक कारवाईच्या भीतीपोटी भरधाव वेगाने वाहने चालवतात. मंगळवारी दुपारच्या सुमारास असाच प्रकार घडला. नदीपात्रातून वाळूने भरलेला ट्रॅक्टर जळगावकडे येत होता. याचवेळी चालकाला पोलिसांचे पथक ट्रॅक्टरचा पाठलाग करत असल्याचे समजले.
कारवाईच्या भीतीपोटी ट्रॅक्टर चालक भरधाव वेगाने वाहन पळवत होता. याचवेळी वाटिकाश्रमजवळ ट्रॅक्टर चालकाने समोर चालत असलेल्या सुमारे सात ते आठ वाहनांना धडक दिली. तसंच एका कारवर जाऊन ट्रॅक्टर आदळला.
दरम्यान, या अपघातात जावेद शेख अजीज (वय-२८, रा. पाळधी), ज्ञानेश्वर ठोसरे (वय-२३ रा. खोटेनगर), रामकृष्ण मराठे (वय-५०, रा. खोटेनगर) हे आणि आणखी दोन जण जखमी झाले आहेत . त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






