जळगाव : – सध्या महाराष्ट्रात लग्नाच्या बहाण्याने तरुण मुलांना फसवणूक झाल्याच्या घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगावातील एका व्यापाऱ्याला त्याचीच बायको चार दिवसांत गंडवून पळून गेल्याची घटना घडली आहे. लग्नाच्या चार दिवसांतच या महिलेने व्यापाऱ्याला फसवलं आणि भावाला भेटण्याच्या बहाण्याने मुंबई स्टेशन वरून पळ ठोकला. या व्यापाऱ्याने महिलेला लग्नासाठी अडीच लाख रुपये दिले होते.
एकीकडे कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद सुरू असताना, कर्नाटकातील ठगबाजांनी महाराष्ट्रातील सरळमार्गी पुरुषांना हेरून लग्नासाठी मुली पुरविण्याचा गोरखधंदा चालवला जातो. अशाच जळगावातील एका सरळमार्गी व्यापाऱ्याला अडीच लाख रुपये उकळून बनावट नवरीसोबत लग्न लावून देण्यात आले.
पैशांचा व्यवहार झाल्यानंतर नवविवाहिता भावाला भेटण्याच्या बहाण्याने मुंबईला घेऊन गेली. मुंबईत पोचल्यावर नवरीने जळगावच्या तरुणाला धमकी देत त्या ठिकाणाहून पलायन केले. आता याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चौघा भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.कांचननगर परिसरातील फरसाण व्यावसायिक शैलेंद्र किशनलाल सारस्वत (वय ४६) यांचा २००७ मध्ये घटस्फोट झाला होता. नंतर त्यांना श्याम गोपीलाल ओझा यांनी प्रकाश सोनी (रा. बेळगाव, कर्नाटक) यांच्या मुलीचे लग्नासाठी चांगले स्थळ आणल्याचे सांगितले. जानेवारी २०२२ मध्ये त्यांनी सारस्वत यांच्या मोबाईलवर काही मुलींचे फोटो पाठविले. त्यातील अपर्णा नावाच्या मुलीचा फोटो आवडल्याने त्यांनी २१ एप्रिल २०२२ सोनी यांच्यासोबत बोलणी केली. लग्न जमवून देण्यासाठी दोन लाख ६१ हजार रुपयांत सौदा ठरला. आगाऊ रक्कम म्हणून शैलेंद्र सारस्वत यांनी २० हजार रुपये सोनी यांच्या मुलीच्या बँक खात्यावर २३ एप्रिलला ट्रान्सफर केले होते.पसंत करताच विवाहऑनलाईन पैसे ट्रान्सफर केल्यानंतर २५ एप्रिलला शैलेंद्र सारस्वत, त्यांची आई मैनाबाई, चुलत भाऊ राजेंद्र पृथ्वीराज सारस्वत, श्याम ओझा व चुलत मावशी यांच्यासह खासगी वाहनाने बेळगाव (कर्नाटक) येथील शास्त्रीनगरमध्ये सोनी या मध्यस्थीच्या घरी पोचले. त्याठिकाणी शैलेंद्र यांनी मुलीला पाहिले आणि पसंत केले. यावेळी तिने तिचे नाव अपर्णा चंद्रकांत नाईक (वय ३३, रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) असे संगितले. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी त्यांनी विवाह केला.
वेळोवेळी उकळले पैसेलग्न होण्यापूर्वी सासरस्वत यांनी सोनी यांच्या मुलीच्या खात्यावर वेळोवेळी पैसे टाकले होते आणि लग्नाच्या दिवशी ७ हजार ५०० रुपये रोख, असे एकूण दोन लाख ६१ हजार रुपये त्यांना दिले होते.संसार सुरू झाल्यावर अवघ्या चार दिवसांत ३० एप्रिलला विवहितेने तिचा भाऊ प्रशांत नालासोपारा येथे राहत असून, त्याला भेटायला जाण्यासाठी हट्ट केला. श्री. सारस्वत पत्नीला घेऊन २ मेस दादरला पोचले.नवरी पसारदादर रेल्वेस्थानकावर शैलेंद्र तिकीट काढत असताना, अपर्णाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. शैलेंद्र यांनी थांबविले असता, त्या विवाहितेने शैलेंद्रशी वाद घालीत माझ्या मागे येऊ नको नाही, तर चपलेने मारीन, अशी धमकी देत शिवीगाळ करून तेथून निघून गेली.
याप्रकरणी माटुंगा पोलिसांत हरविल्याची तक्रार दिली आहे.फसवणुकीचा गुन्हा दाखलया प्रकाराबाबत सारस्वत यांनी प्रकाश सोनी, माधुरी चव्हाण, त्या विवाहितेचा मामा यांना कळविले. मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. सोनी याने शैलेंद्र सारस्वत यांना धमकीही दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सारस्वत यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश चव्हाण तपास करीत आहे.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.