पारोळा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती प्रमुखपदी डॉ सँभाजीराजे पाटील.

Spread the love


पारोळा:-भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने भारताचा गौरवशाली इतिहास घराघरात पोहचविण्यासाठी २६ जानेवारी ते १५ आगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमातून देशभक्तीचा जागर करण्यात येणार आहे.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या आयोजन समितीद्वारे विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत या समितीच्या प्रमुखपदी डाँ.संभाजीराजे पाटील तर सहप्रमुखपदी देविदास वाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा ज्वाजल्य व गौरवशाली इतिहास घरघरात पोहचविण्यासाठी देशाच्या स्वातंत्राला 75 वर्ष पूर्ण झाल्याने हे वर्ष अमृत महोत्सव म्हणून देशभर साजरे व्हावे या उद्देशाने देशभरात गावागावात समिती स्थापन करून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन प्रजसत्ताक दिवस ते स्वातंत्र्य दिवस या कालावधीत तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहेत.


26 जानेवारी सकाळी भारतमाता पूजन तसेच महापुरुष पुतळ्याना माल्यार्पण तथा अभिवादन , दीपोत्सव तसेच मशाल पेटवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सुरुवात करण्यात येईल 15 ऑगस्ट पर्यंत वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात नागरिकानी उस्फुर्त सहभाग घ्यावा असे आवाहन समिती प्रमुख डॉ सँभाजीराजे पाटील आणि समिती सदस्य यांनी केले असून सर्व कार्यक्रम कोरोना नियम पाळून साजरे केले जातील अशी माहिती यावेळी देण्यात आली.

समितीत यांचा आहे समावेश

समितीप्रमुख डॉ संभाजीराजे पाटील,समिती सहप्रमुख देवीदास वाणी तर समिती सदस्य ऍड. भूषण माने, शीतल अकॅडमीचे संचालक रविंद्र पाटील, सी.ए. मुकेश चोरडिया, डाॅ.विशाल शेंडे, डाॅ.अनिल गुजराथी,डाॅ.सुदर्शन जैन, उद्योजक गोपाल अग्रवाल, दिनेश गुजराथी, बालाजी संस्थांचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी,टाइम्स ग्रुपचे राहुल निकम,ऍड. विशाल महाजन, कैलास चौधरी, पत्रकार विशाल महाजन, माणिक जैस्वाल, अड. क्रुतिका आफ्रे, प्रा. अन्नपूर्णा पाटील, शालिनी पवार,नेहा वैद्य यांचा समावेश
असून तालुका कार्यवाहक आकाश बडगुजर, रविद्र सोनार, प्रितेश जैन, ज्ञानेश्वर बुंधे यांच्यासह स्वयंसेवकांचे सहकार्य लाभणार आहे.

टीम झुंजार