जळगाव : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत जिल्हातील सर्वात लक्षवेधी लढतीत मुक्ताईनगर मतदार संघातून दूध संघाच्या मावळत्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांचा पराभव झाला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजी मारली असून एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्हा दुध संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली. यात आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे मुख्य प्रशासकपदाची धुरा आली. या निर्णयाच्या विरोधात खडसे गट न्यायालयात गेले. तेथे या निर्णयाला स्थगिती मिळाली. तथापि, त्यांना प्रशासकपदासाठी ३२ दिवसांचा कालावधी मिळाला. या काळात त्यांनी दुध संघातील अपहाराचे प्रकरण शोधून काढत गुन्हा दाखल केला. यानंतर दुध संघाची निवडणूक लागल्यानंतर त्यांनी आपण खडसे कुटुंबातील सदस्याच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. यानंतर त्यांनी थेट मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून मावळत्या अध्यक्षा मंदातकिनी खडसे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता.
यात सर्वात चुरशीच्या असलेल्या मुक्ताईनगर मतदारसंघात आ. एकनाथ खडसेच्या पत्नी व दुध संघाच्या चेअरमन सौ. मंदाताई खडसे यांना भाजपचे आ. मंगेश चव्हाण यांनी पराभूत केले आहे. या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागून होते.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






