चाळीसगाव प्रतिनिधी नेहा राजपूत
चाळीसगाव :- सामाजिक कार्यकर्ते अनिल वाल्मीक चौधरी (ठाकरे ) यांनी बालिका दिनाला स्तुत्य असा उपक्रम राबवून आपल्या प्रभागातील गरजू 10 बालिकांचे सुकन्या योजनेत समावेश करून त्यांचे खाते दत्तक घेत त्यांना आधार देण्याचे काम केले आहे.या उपक्रमातून त्या मुलींच्या खात्यांमध्ये आठरा वर्षापर्यंत आपल्या परिस्थितीनुसार दरवर्षी काही रक्कम अनिलभाऊ त्या मुलींच्या खात्यात भरणार आहेत. आज राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त डाक विभागाचे अधीक्षक श्री.नागरगोजे सर,सहाय्यक अधीक्षक जगदाळे सर, पोस्टमास्तर बडगुजर नाना, यांच्या अनमोल मार्गदर्शनातून सामाजिक कार्यकर्ते व गौताळा रेसिडेन्सी पार्कचे संचालक अनिल वाल्मीक चौधरी (ठाकरे) यांनी हा उपक्रम राबवून चांगला संदेश समाजात देण्याचा प्रयत्न केला आहे. मुलींच्या सुकन्या समृद्धिचे खाते चाळीसगाव हेड पोस्ट ऑफिस मध्ये स्वखर्चाने उघडून दिले आहे. दत्तक घेतलेल्या मुलींच्या भविष्यातील शैक्षणिक,सामाजिक व वैवाहिक जीवनासाठी एक प्रकारे नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न अनिलदादा यांनी केल्याचे सांगितले. मी हे खाते उघडले तरी दरवर्षी माझ्या परिस्थिती प्रमाणे या खात्यामध्ये आठरा वर्षापर्यंत पैसे टाकत जाईल व त्यांच्या शैक्षणिक कार्यास मी सर्व मुलींना एक प्रकारे शैक्षणिक दत्तक घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त प्रभागातील दहा बालिकांना एक मोठा आधार दिला याप्रसंगी सदर बालकांचे आई वडील चाळीसगाव हेड पोस्ट ऑफिस मधील सहाय्यक डाकपाल मनोज करंकाळ, सागर पाटील, विक्रांत बडगे, सहाय्यक पोस्ट मास्तर सुनील वानखेडे तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय चौधरी, मोहन चौधरी, राहुल कुंभार, नीलेश महाले, पप्पू बाळकर, विकास देशमुख, पप्पू चौधरी, भिमा कुंभार, पंकज वाणी, मोहित चौधरी व प्रभागातील सर्व महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत बडगे यांनी केले कार्यक्रमाची माहिती मनोज करणकाळ यांनी दिली.श्री अनिल वाल्मीक चौधरी (ठाकरे) यांनी उपस्थितांचे आभार मानले.