प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :-येथे दिनांक 24 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय येथे 19 रूग्णांचे अँटीजन टेस्ट घेण्यात आली यामध्ये एरंडोल शहरातील 10, व ग्रामीण भागातील 9 यामध्ये 3 रुग्ण हे आर टी पी सी आर असे तालुक्यातील एकूण 19 रुग्णाच्या अहवाल पॉझिटिव आढळून आला आहे.
आढळून आलेल्या रूग्णांमध्ये एरंडोल शहरातील इंद्रप्रस्थ काँलनी परिसरातील 43 वर्षीय पुरुष,भावसार गल्ली परिसरातील 72वर्षीय महिला,व 80वर्षीय पुरुष साने गुरुजी काँलनी परिसरातील 24 वर्षीय महिला
,पद्मालय नगर परिसरातील 50 वर्षीय महिला, गांधी पुरा परिसरातील 13 वर्षीय मुलगी,माळी वाडा परिसरातील 44 वर्षीय महिला ,ओम नगर परिसरातील 29 वर्षीय महिला व 9 वर्षीय मुलगी,लोमा काका नगर परिसरातील 32 वर्षीय महिला तसेच ग्रामीण भागातील विखरण येथील 17 वर्षीय मुलगा व 12 वर्षीय मुलगी,पद्मालय येथील 38 वर्षीय खडके येथील 15 वर्षीय मुलगा,विटनेर येथील 12 वर्षीय मुलगी,तळई येथील 1रुग्ण अँटीजन मध्ये 1रुग्ण आर टी पी सी आर मध्ये तसेच कासोदा येथील 2 रुग्णाच्या आर टी पी सी आर अहवाल कोरोणा पॉझिटिव्ह आला आहे.
असे एरंडोल शहरातील 10 व ग्रामीण भागातील 9 असे एकूण तालुक्यातून एकूण 19 रुग्णांचा अहवाल कोरणा पॉझिटिव आढळून आला आहे.