गुलाबराव पाटील यांनी गायली कव्वाली;उपस्थितांचा टाळ्यांचा कडकडाट, हरकती पाहून श्रोते अवाक, पहा व्हिडिओ..

Spread the love


जळगाव :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच जळगाव तालुक्यातील एका गावात मंत्री गुलाबराव पाटील यांनी चक्क कव्वाली म्हणून सर्वांचेच लक्ष वेधल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी हे गाणे तोंडपाठ होते. मंत्र्यांना तोंडपाठ कव्वाली म्हणताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. यावेळी उपस्थितांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना दाद दिल्याच पाहायला मिळाले. शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ म्हणून मंत्री गुलाबराव पाटील यांची ओळख आहे. शेरोशायरी द्वारे आपल्या अनोख्या शैलीतील भाषणातून मंत्री गुलाबराव पाटील विरोधकांवर निशाणा साधत असतात. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही कव्वाली सादर करत उपस्थियांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी मंत्र्यांना भरभरून प्रतिसाद दिला.

गुलाबराव पाटील सुरुवातीला गायला उभे राहिले तेव्हा ते फार तर एक-दोन ओळी गाऊन खाली बसतील, असा सगळ्यांचा अंदाज होता. मात्र, गुलाबराव पाटील यांनी रंगात येऊन कव्वाली गायला सुरुवात केल्यानंतर उपस्थितांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. या कव्वालीतील एकूण एक शब्द आणि गाण्यातील प्रत्येक हरकत, तान गुलाबराव पाटील यांना माहिती होती. त्यामुळे मंचावरील उपस्थित श्रोत्यांनी गुलाबराव पाटलांचा उत्साह वाढवला. यावेळी सगळ्यांच्याच चेहऱ्यावर गुलाबराव पाटील यांच्या गायन कौशल्याबद्दल कौतुकाची भावना दिसत होती. गुलाबराव पाटील यांना कव्वाली झाल्यानंतर खुदा हाफिस म्हणत श्रोत्यांचा निरोप घेतला.

पहा व्हिडिओ :

पहा व्हिडिओ :

जिल्हा दुग्ध संघाच्या निवडणुकीत

जळगाव जिल्हा दुग्ध संघाच्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला होता. या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना जोरदार धक्का दिला. भाजप- शिंदे गटाच्या उमेदवारांनी मुसंडी मारली असून वीस जागांपैकी १६ जागांवर भाजप- शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर ५ जागांवर महाविकास आघाडीचे उमदेवार विजयी झाले आहेत. तब्बल सात वर्षानंतर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटाने सत्ता मिळवली असून एकनाथ खडसे यांच्या गडाला सुरुंग लावला. दणदणीत विजयानंतर गिरीश महाजन, गुलाबराव पाटलांसह मंगेश चव्हाणांनी जल्लोष केला. गिरीश महाजानांसह गुलाबराव पाटलांनी भन्नाट डान्स केला होता.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार