पारोळा तालुक्यात वर्षभरात गुन्ह्याच्या संख्येत 101 ने वाढ 353 गुन्हे पैकी 273 गुन्हे उघडकीस पोलिसांना यश

Spread the love


पारोळा:- तालुक्यात सन 2019 च्या तुलनेत सन 2020 मध्ये विविध गुन्ह्याच्या संख्येत 101 ने चिंतनीय वाढ झाली आहे. त्यात सर्व प्रकारच्या गुन्ह्याचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण 353 गुन्हे पैकी 273 गुन्हे उघडकीस आनण्यात मात्र पोलिसांना यश आले आहे. बाकी गुन्हेचा उलगडा होणे अद्याप बाकी असून ते उगडकीस आणून वाढते गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न पोलिसांना या वर्षात करावा लागणार आहे.


114 खेडी एक शहर असे जवळपास पावणे दोन लाख लोकसंख्याच्या तालुक्याला एकमेव पोलीस स्टेशन आहे. त्यात ब्रिटिश कालीन पोलीस संख्या मंजूर असून ती देखील आज अखेर पूर्ण पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यात तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक 33 किमी राष्ट्रीय माहर्गाची हद्द येत असून तुलनेने अपघात संख्या वाढीला ते सर्वात मोठी डोखेदुखी पारोळा पोलिसांना ठरत आली आहे.


तालुक्यात सन 2021 व सन 2020 मध्ये नोंदविण्यात आलेले गुन्हेचे प्रकार खालील प्रमाणे कंसात 2021 चे आकडे खून (0) 5, सदोष मनुष्य वध(1) 0, खुनाचा प्रयत्न (4) 3, बलात्कार (4) 3, विनयभंग (20) 12, पोस्को (2) 0, दरोडा(4) 6, जबरी चोरी(5) 0, घरफोडी (21) 7, एकूण चोरी (64) 56, दंगा (37) 11, ठकबाजी (6) 11, पळवून नेणे (8) 8, दुखापत (47) 24, सरकारी नोकर हल्ले (5) 0, आत्महत्या प्रवृत्त करणे (3) 4 , इतर 1 ते 5 अंतर्गत गुन्हे (91) 67 दरम्यान वर्ष 2021 मध्ये एकूण 353 गुन्हे हे घडले आहेत. त्यापैकी 273 गुन्हे उघडकीस आले आहेत. तर सन 2020 मध्ये एकूण 252 गुन्हे पैकी 200 गुन्हे हे उघडकीस आले होते

तंटामुक्त गाव अभियानाची गरज


तत्कालीन गृहमंत्री कै आर आर पाटील यांनी त्यांचा कार्यकाळात गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी गावा गावात महात्मा गांधी तंटामुक्त अभियान हे बक्षीस पात्र स्वरूपात राबविले होते. त्यामुळे पोलिसांचा भार हा कमी होऊन गुन्हे दाखल चे प्रमाण हे कमी होऊन गाव तंटामुक्ती कडे वळीत होते.परंतु कालांतराने हे अभियान मागे पडले आहे. त्यामुळे प्रत्येक लहान मोठे तंटे हे पोलीस ठाण्यात येत असल्याने गुन्हे नोंद संख्या वाढत आहे. परिणामी तंटामुक्ती अभियान पुन्हा राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

टीम झुंजार