एरंडोल:- तालुक्यातील खडकेसिम येथील शेताची राखण करणाऱ्या मजुरांस जबर मारहाण करून त्याच्या जवळ असलेला मोबाईल हिसकावून पडून गेलेल्या दोन आरोपींना एरंडोल पोलिसांनी तीन तासाच्या आत जेरबंद केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की एरंडोल पोलीस ठाणे येथे दिंनाक १४/१२/२०२२ रोजी शेताची राखण करणारा मजूर गोंविदा धनसिंग पाटील रा. खडकेसिम ता.एरंडोल जि जळगाव यांच्या फिर्यादीवरुन एरंडोल पोलीस ठाणे गु.रं.क्रं. २३१/२०२२ कलम ३९४,३४ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
शेताची राखण करणारा मजूर गोंविदा धनसिंग पाटील मुंकूद महाजन यांच्या गिता सिंमेट फार्म हाऊस मध्ये शेतीमजुरी व राखण करण्याचे काम करतात. दिनाक १२/१२/२०२२ रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास एरंडोल केवडीपुरा परीसरात राहणारे इसम नामे सुक्या व उम्या व १ अनोळखी इसम हे नमुद फार्म हाऊस मध्ये गेले व तेथे शेताची राखण करीत असलेले तक्रारदार गोंविदा पाटील व त्यांचा सहकारी नामे राजु चव्हाण यांना शिवीगाळ करुन त्यंाना दोंघाना लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्यांच्या कडे असणारे किंमत अंदाजे १४५००/- रुपयाचे मोबाईल बळजबरीने हिसकावुन पळुन गेले बाबतच्या हकीगतीवरुन वर नमुदप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
नमुद गुन्हयाचे अनुशंगाने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी तात्काळ तपासाची सुत्रे फिरवुन गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश अहीरे यांच्याकडे सोपवुन पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांना आरोपीतांना तात्काळ शोधुन आणुन अटक करण्याचे आदेशीत केले त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार अनिल पाटील, पोलीस नाईक / कुमावत, अकील मुजावर, पोकों पाचपोळ यांच्या सह रवाना झाले
पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार आरोपीत इसम हे गुन्हयाची कुणकुण लागताच एरंडोल शहरातुन पोबारा करणार होते. त्यावरुन मिळालेल्या माहीतीनुसार पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांनी पथकातील अंमलदारांना विखरण रोडवरील अंजनी कालव्याच्या पाटचारीत सापळा रचण्याचे सुचना दिल्या होत्या तेथील पाटमोरीच्या आडोशाला ०२ इसम संशयीत बसलेल्या स्थितीत हवालदार अनिल पाटील यांना दिसले त्यांनी खुण करुन पथकातील अंमलदारांना इशारा केला त्या ०२ संशयीत इसमांनी पोलीसांना पाहुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीसांनी शिताफीने पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले त्यांच्या कडे विचारपुस करता त्यांनी त्यांच्या नावे सुकलाल उर्फ सुक्या हरी बागुल व उमेश उर्फ उम्या गोकुळ मोरे दोन्ही राहणार केवडीपुरा ता. एरंडोल असे सांगीतले नमुद गुन्हयात त्यांचा स्पष्ट सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी केलेल्या कामगीरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दिनाक १५/१२/२०२२ रोजी मा. न्यायालयात आरोपीतांना हजर केले असता, त्यांना न्यायालयाने ०१ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करीत आहेत.
हे पण वाचा
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.