मुलींनी झाशीच्या राणी सारखे शुर बनावे; विनिता जोशी

Spread the love

श्रीरामपूरमध्ये राष्ट्रीय बालिका दीन साजरा ; ओरिएंटलतर्फे मुलींना ३ लाखांचा विमा प्रदान

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) – आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्तुत्वाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे,जगातील अनेक राष्ट्रामध्ये महिला उत्तम काम करत आहेत,अगदी महिलांनी अंतराळ पर्यंत मजल मारली आहे तेव्हा आजच्या मुलींनी प्रत्येक ठिकाणी पुढे जायचे आहे झाशीच्या राणी सारखे शुर व पराक्रमी बनून येणाऱ्या संकटाला खंबीरपणे तोंड द्यायचे आहे. समाजातील अपप्रवृत्ती गाडून टाकण्यासाठी धाडसी बनायचं असल्याचे प्रतिपादन ओरिएंटल इन्शुरन्स पुणे विभाग चीफ रिजनल मॅनेजर विनिता जोशी यांनी केले.


राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त इंडियन रेड क्रॉस सोसायटी व ओरिएंटल इन्शुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विनिता जोशी प्रमुख पाहुण्या म्हणून मुलींना मार्गदर्शन करत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक सचिन मुळे,पुष्पा शिंदे,वर्षा दातीर,पोपटराव शेळके,भरत कुंकूलोळ,ओरिएंटल चे प्रशासकीय अधिकारी सागर जावळे,प्रमोद पत्की,अश्विनी लिप्टे,सागर गिरनार,नानासाहेब मुठे,सोपान ननावरे,संतोष अभंग, भास्कर अहिरे,सुजाता पोपळघट, अनुराधा काळे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्तविक सचिव सुनील साळवे यांनी केले,


त्यानंतर बालिका व त्यांच्या माताना ओरिएंटल इन्शुरन्सचे वतीने बालिका दिनानिमित्त प्रत्येकी 3 लाख रुपयाचा विमा मोफत देण्यात आला, सदरच्या पॉलिसी वितरण विनिता जोशी व साईलता सामलेटी यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी बलिकांनी भाषणे व गीते सादर केली.मंगल वाघ यांनी बालिका दिनाचे महत्व विशद केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना साईलता सामलेटी यांनी मुलींनी अभ्यासात गुणवत्ता सिद्ध केल्याचे सांगत भविष्यात उच्च पदावर जावून आपलं कुटुंब,गांव शाळेचा लौकिक मिळवावा आणि झाशीच राणी लक्ष्मीबाईसह
राजमाता जिजाऊ मां साहेब, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले,
संत मदर तेरेसा,फातिमा शेख,यांचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवून प्रगती करवी असे आवाहन करत बालिका दीन साजरा करण्याचे कारण विशद केले.


आभार दिनेश दीक्षित यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी पार होण्यासाठी सचिव सुनील साळवे,ओरिएंटल इन्शुरन्स प्रशासकीय अधिकारी सागर जावळे,सुजाता पोपळघट, मुख्याध्यापक सचिन मुळे, नानासाहेब मुठे,सागर गिरनार, सोपान ननावरे, वैष्णव पोपळघट, ओंकार पोपळघट,आकाश चौगुले,दादा वामन जोशी नवीन मराठी शाळा सर्व स्टाफ आदींनी परिश्रम घेतले.

टीम झुंजार