निंभोरा येथे शेतकरी मेळावा संपन्न

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे
रावेर :-
तालुक्यातील निंभोरा येथे भारतीय स्टेट बँकेत शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी अंबादास धोंडू चौधरी या शेतकऱ्यांनी बँकेचे व्यवस्थापक राधेश्याम मांगमोळे कर्मचारी सुनील बावस्कर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

या शेतकरी मेळाव्यात बँकेचे व्यवस्थापक मांगमोळे यांनी शेतकरी बांधवांना पीक कर्ज योजना व पीक कर्ज नूतनीकरणाचे फायदे यासंबंधी सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाला अंबादास चौधरी वासुदेव चौधरी रवींद्र गव्हाळे सुनील सावळकर मंगेश पवार स्वप्निल पवार तुषार पाटील उमेश पाटील व समस्त शेतकरी बांधव यांची उपस्थिती होती.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार