जळगाव,(प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात आणि जळगाव जिल्ह्यात गुरांची चोरी करण्याचे प्रमाण वाढले असतांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज गुरं चोरणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून टोळीतील तीन संशयित आरोपींना जळगाव शहरातील अजिंठा चौक परिसरातून दोन जणांना अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी शुक्रवारी १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषदेत दिली.
गुरं चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या ; तब्ब्ल १९ गुन्हे उघड…
जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी गुरं चोरीच्या घटना घडल्या असून यापैकी १९ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले असून जामनेर -१, भडगाव-२, अमळनेर-३, एरंडोल-२, पारोळा-२, चोपडा-१, जळगाव तालुका-३, मुक्ताईनगर-४, पाचोरा-१ असे एकुण १९ गुन्हे उघडकीस आले आहे. संशयित आरोपींकडून अजून गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून गेल्या काही दिवसांपासून गुरांची चोरी होत असल्याबाबत अनेक गुन्हे दाखल होते. यासंदर्भात गुरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या सुचना पोलीस अधिक्षकांनी दिले. त्यानुसर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली. यात धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील मोहंमद फयाज मोहंमद अयाज हा अजिंठा चौकात स्कॉर्पीओ कार क्रमांक (एमएच १२ बीव्ही ९४१५) घेवून उभा असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने गुरे चोरी केल्याची कबुली दिली.
यात वसीम मोहमंद अस्लम कुरेशी आणि नईम शेख कलीम दोन्ही रा. मासुमवाडी यांना देखील अटक केली आहे. तर जाफर गुलाबर नबी रा. पाळधी ता.धरणगाव, हारून उर्फ बाली शहा रा. धुळे, अरशद रा. धुळे, आणि मनोज उर्फ मोन्या विठ्ठल पाटील रा.कुसुंबा ता.जळगाव असे इतरांचे नाव निष्पन्न झाले असून त्यांचाही शोध सुरू आहे. या कारवाईत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकुण ३ जणांना अटक केली असून दोन स्कॉर्पीओ वाहने जप्त केली आहे.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.