जळगाव : सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगावमध्ये एका अज्ञात वाहनाने कट मारल्याने कापसाचा भरलेला ट्रक रस्ता लगत उलटल्याची घटना घडली आहे. या घटनेत ट्रकमधील एक तरुण जागीच ठार झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जळगाव तालुक्यातील ममुराबाद विदगाव रस्त्यावर हा अपघात झाला जखमींना जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. राज रवींद्र अहिरे (वय-२०, रा. मुंगटी ता. जि. धुळे) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
धुळे जिल्ह्यातील मुंगटी येथील ट्रक क्रमांक (एम.एच १८ एए १०८०) हा ट्रक मजुरांसह यावल येथील डांभुर्णी येथे कापूस भरण्यासाठी गेला होता. त्यानंतर गुरुवारी १५ डिसेंबरला सकाळी ट्रकमध्ये कापूस भरून परत मुंगटी येथे जाण्यासाठी निघाला होता. दुपारी ३ वाजेच्या सुमारास ममुराबाद ते वीदगाव रस्त्यावरील फार्मसी कॉलेजजवळून जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने ट्रकला कट मारला.
यात ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात राज रवींद्र अहिरे हा तरुण जागीच ठार झाला तर प्रमोद संभाजी पाटील (वय-४०), भरत दगडू पाटील (वय-३२), दिगंबर दिलीप पाटील (वय-३०), रवींद्र बारकू भिल अहिरे (वय-५०), जितेंद्र पवार (वय-३५), निंबा दगडू पाटील (वय-३६) आणि बुधा पाटील (वय-६०) सर्व राहणार मुंगटी ता. जि.धुळे हे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले आहे. याप्रसंगी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. या घटनेबाबत अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.