न्यू इंग्लिश स्कूल येथील 1996 च्या दहावीच्या बँच चे मित्र-मैत्रिणी तब्बल पंचवीस वर्षांनी एकत्र येऊन आपल्या आठवणींना दिला उजाळा

Spread the love

निंभोरा ता रावेर प्रतिनिधी– परमानंद शेलोड

रावेर :- तालुक्यातील निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूल चे 1996 च्या बॅचचे विद्यार्थी हे तब्बल 25 वर्षांनी एकत्र येऊन आपल्या आठवणींना उजाळा देत त्यांनी आपला स्नेह मेळावा तेथील कृषी विद्यालय येथे संपन्न केला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक ए एच वारके सर होते सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून झाली नंतर आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपला परिचय आणि आपण 25 वर्षात काय अनुभवलं हे सर्वांना सांगितलं त्यानंतर मोहम्मद पिंजारी, नीलिमा सरोदे, अर्चना डाके, हेमंत पवार, कृष्णा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक टी.पी. बोरोले सर यांनी सर्व विद्यार्थी समान असतात सर्वांना शिकवण सारखीच असते असे आपल्या मनोगतात जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ए एच वारके सरांनी यशाची शिखर गाठताना आपले पाय जमिनीवर ठेवा आणि आपल्या आई-वडिलांची काळजी घ्या असा गुरु मंत्र पुन्हा आपल्या विद्यार्थ्यांना दिला

आपल्या या स्नेहा मेळाव्याच्या कार्यक्रमाला जळगाव नाशिक औरंगाबाद पुणे भंडारा भुसावळ वरणगाव निंभोरा येथील अर्चना डाके, निलेश भिरूड, अजय भंगाळे महेश बारबंद मोहम्मद पिंजारी राजेंद्र महाले हेमंत पवार ललिता वारके हेमांगी बराटे यामिनी चौधरी सुनीता येवले माधुरी वानखेडे मनीषा पाटील वैशाली पाटील नीलिमा सरोदे कांचन झोपे संगीता भंगाळे राजश्री वारके भारती मापारी योगेश भिरूड संदीप भोगे विवेक बोंडे निलेश भंगाळे अमजद खान संजय बराटे निलेश भोगे सचिन बराटे सुरेश गवळी योगेश दोडके रवींद्र निंभोरे अमित पवार रमेश महाले योगेश बोरनारे दिगंबर येवले राजेंद्र भोई नितीन गुप्ता खेमचंद महाले उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रस्ताविक विवेक बोंडे यांनी केले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार