चाळीसगाव :- सध्या महाराष्ट्रात प्रेम संबंधातून घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुझ्या मुलाने माझ्या बहिणीला पळवून नेलं म्हणून रागाच्या भरात भावाने आपल्या नातेवाईकासह मुलाच्या बापावर कोयत्याने सपासप वार करून त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना मेहुणबारे पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर आज दि.१६ रोजी घडली. या घटनेने मेहुणबारे गावासह संपूर्ण चाळीसगाव तालुका हादरला आहे.
काय आहे घटना ?
सविस्तर वृत्त असे की संशयित आरोपी सचिन राजेंद्र चव्हाण याच्या बहिणीला दगडू वामन गढरी यांच्या मुलाने पळवून नेलं. दोघांनी प्रेमविवाह देखील केला आहे. त्याचा आकस मनात धरून असलेल्या सचीन राजेंद्र चव्हाण याने आपल्या नातेवाइकांसह काल दि.१६ रोजी सकाळी ११ वाजता दगडू गढरी (वय ४५) यांच्यावर हल्ला चढवत धारधार कोयत्याने त्यांच्या मानेवर सपासप वार करून त्यांची हत्या केली.
शुक्रवार बाजाराचा दिवस असल्याने गर्दीचा फायदा घेऊन मारेकरी गर्दीत पसार झाले. सदर घटना घडताचं परिसरात एकच धावपळ उडाली.धावपळ कसली हे पाहण्याकरिता पोलीस कर्मचारी त्या पोहचले असता त्यांना दगडू गढरी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.तसेच त्यांच्या माने जवळ कोयता पडलेला होता. ते जागीच ठार झाले होते पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल करून मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला तसेच तत्काळ तपासाला सुरुवात केली असुन गढरी यांची हत्या एकट्याने केली नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हल्ला झाला त्या वेळी तेथे कोणकोण होतं? त्यांनी काय पाहिलं? मोटासायकलीवरून आरोपी आले त्यांची संख्या नेमकी किती? याचा शोध पोलीस घेत आहेत. पसार झालेला संशयित आरोपी सचिन राजेंद्र चव्हाण आणि इतर आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झाली आहेत.या प्रकरणी रात्री उशिरा पर्यत एकही आरोपी अटकेत नव्हता असे समजते.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.