ठरलं ; जिल्हा दूध संघ चेअरमनपदासाठी या नावावर शिक्कामोर्तब !

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच संपूर्ण राज्यभर चर्चेत राहिलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणूक नंतर चेअरमन पदी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. चेअरमन पदासाठी अनेक नावं चर्चेत असताना चेअरमन निवडीच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाची बैठक शनिवार दिनांक १७ रोजी आयोजित करण्यात आली होती या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत मंत्री गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय चाळीसगावचे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे मात्र या संदर्भात अधिकृत घोषणा आज रविवार, १८ रोजी होणार आहे.

शनिवारी रात्री उशिरा ११ वाजेपर्यंत नूतन संचालकांची बैठक झाली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांची मोठी भूमिका आहे.

खडसेंच्या विरुद्ध बंड पुकारून निवडणुकीत रंगत आणली, तर मुक्ताईनगर मतदार संघातून मंदाकिनी खडसे यांना त्यांच्याच मतदार संघातून आव्हान देत विजय मिळविला या विजयामुळे मंगेश चव्हाण राज्याच्या राजकारनात चर्चेत आले.दरम्यान चेअरमनपदी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते अखेर आमदार चव्हाण यांच्याच नावावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार