जळगाव : तुझ्या भावाने आमच्याशी वाद घातला, तुम्हा दोघा भावांना संपवून टाकू म्हणत खुशाल मुकुंदा ठाकूर (१८, रा. तुकारामवाडी) या तरुणाच्या मागे तलवार घेऊन पळत सुटल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिस चार जणांविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास तुकारामवाडीत घडली.
ठाण्यात खुशाल ठाकूर हा तुकारामवाडीत कुटुंबासह वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्री ८.३० वाजता खुशाल हा तुकारामवाडीतील एका इलेक्ट्रिक डीपीजवळ बसलेला होता. त्याठिकाणी आकाश ऊर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (२२), पवन ऊर्फ बघा दिलीप बाविस्कर (२२), चेतन ऊर्फ बटाट्या रमेश सुशिर (१८) व उमाकांत ऊर्फ दोधा दत्तात्रय धोबी (१८) हे वेगवेगळ्या दुचाकीने आले.
परवा तुझ्या भावाने आमच्याशी वाद घातला. तुम्हा दोघा भावांना पाहून घेऊ आणि संपवून टाकू अशी धमकी आकाश व चेतन याने खुशाल याला दिली. नंतर तो तेथून घाबरून घराकडे पळू लागला. चौघांनी त्याचा पळत पाठलाग केला. त्यावेळी आकाश याच्या हातात तलवार होती.
खुशाल हा जोरजोरात आरडा-ओरड करत पळत असल्यामुळे तेथे त्याची आजी मंजुळाबाई या आल्या. मात्र, त्यांना सुध्दा चौघांनी दमदाटी करून शिवीगाळ केली. मंजुळाबाई यांनी आरडा-ओरड केल्यानंतर चौघांनी तेथून पळ काढला. अखेर रात्री खुशाल ठाकूर याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरणा पंपिंग परिसरातून अटक-
पोलिस निरिक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, हेमंत कळसकर, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील, इम्रान सैय्यद, गोविंदा पाटील, सचिन पाटील, राहुल रगडे, साईनाथ मुंडे, इम्तियाज खान यांनी चौघाही संशयितांना गिरणा पंपिंग परिसरातून अटक केली आहे.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.