जळगांव : – सघ्या महाराष्ट्रात राज्यात गुन्हेगारी सत्र सुरुचं आहे.अश्यातच जळगाव शहरातील जुने बसस्थानक परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाचा चाकू भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. आकाश सुरेश सपकाळे (वय ३० रा. कोळीपेठ, जैनाबाद, जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

दरम्यान, जुन्या वादाचा तरुणांच्या दोन गटात भडका उडाला आणि यातूनचं तरुणाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयाचा जल्लोष साजरा केला जात असताना दुसरीकडे जळगावात घडलेल्या या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील जुने बसस्थानकजवळ एका दुकानासमोर दोन गट समोरासमोर आल्याने जुन्या वादातून शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने एकाने आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे या तरूणावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. तसेच आकाशचा भाऊ सागर सुरेश सपकाळे आणि त्याचा मित्र सागर आनंदा सपकाळे यांच्यावरही वार केल्याने ते दोन जण जखमी झाले आहे.
या दरम्यान जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील यासह जिल्हापेठ व शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांसह मित्र परिवाराची प्रचंड गर्दी जमली होती. तरूणावर वार करणारा आण्णा उर्फ गोपाळ कैलास सैंदाणे (रा. कोळी पेठ, जळगाव) याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हत्या करण्याचे नेमके खरे कारण समोर आलेले नसून जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






