रायपूर : – सध्या देशात प्रेम प्रकरणातून घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने महिलेने पहिल्या प्रियकराची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे उघडकीस आला आहे. मयत तरुण हा बाल कल्याण समितीचा सदस्य होता. सीसीटीव्ही फूटेजमुळे या हत्याकांडाचा खुलासा झाला. आरोपी महिला एका अन्य तरुणासोबत एक भरलेला ड्रम स्कूटरवरुन घेऊन जात असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं होतं. या आधारे तपास करत पोलिसांनी हत्येचा उलगडा केला.
आरोपी महिला लाभनी साहू विवाहित होती. तिचा पहिला प्रियकर अर्थात मयत तरुणही विवाहित होता. त्याचं नाव चंद्रभूषण ठाकूर. अफेअर सुरु असतानाच लाभनीचा जीव दुसऱ्याच पुरुषावर जडला. त्यानंतर त्याच्या मदतीने महिलेनी पहिल्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
चंद्रभूषण बुधवारपासून बेपत्ता होता. आरोपी प्रेयसी लाभनीने चंद्रभूषणच्या बायकोला फोन केला. त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याचं तिला सांगितलं. त्यानंतर चंद्रभूषणच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
राजनांदगाव जिल्ह्यापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरगड येथील कोटडा पानी जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याचं पोलिसांना समजलं. मयत व्यक्तीचा चेहरा पूर्णपणे भाजलेला होता. पोलिसांना मृतदेह ताब्यात घेत तपास सुरु केला. त्यावेळी तो चंद्रभूषण ठाकूर याचाच मृतदेह असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी हत्येच्या अँगलने तपास सुरु केला.
पोलिसांनी चंद्रभूषणचं मोबाईल लोकेशन ट्रेस केलं. त्यासोबतच त्याच्या हरवलेल्या अॅक्टिव्हाचाही शोध सुरु केला. यावेळी ती स्कूटर लाभनीच्या घराबाहेर सापडली. तर लाभनी राहत असलेल्या लखोली भागातच चंद्रभूषणचा फोन बंद झाला होता. त्यामुळे पोलिसांना सुरुवातीपासूनच तिच्यावर संशय होता. त्यांनी लाभनीची कसून चौकशी केली.
पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच लाभनीने आपला गुन्हा कबूल केला. आपल्या दुसऱ्या प्रियकराबद्दल चंद्रभूषणला समजलं. त्यामुळे त्याच्या मदतीनेच चंद्रभूषणची गळा आवळून हत्या केल्याचं तिने सांगितलं. चंद्रभूषणच्या पत्नीला समजलं तर, या भीतीने तिने दुसरा प्रियकर नूतनच्या मदतीने त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्याचा मृतदेह दोघांनी ड्रममध्ये भरुन डोंगरगढपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात फेकला. तर मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी त्यांनी त्याचा चेहराही जाळला.
लाभनीचे पहिले लग्न झाले होते, पण तिचा नवरा तिला सोडून गेला. काही दिवसांनी ती चंद्रभूषणसोबत राहायला लागली. यादरम्यान चंद्रभूषणने तिला पैसेही दिले. मात्र तितक्यात लाभनीच्या मनात दुसराच कोणी भरला. ही गोष्ट चंद्रभूषणला समजताच त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने तिच्याकडे पैसे परत मागितले. त्यामुळे कंटाळून लाभनीने त्याचा जीव घेण्याचं ठरवलं. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
हे वाचलंत का ?
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.