बलवाड़ी ग्रामपंचायतच्या इतिहासात पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच पदी सौ. वैशाली महाजन

Spread the love


निंभोरा बु।।ता रावेर (वार्ताहर) :- बलवाड़ी ता रावेर येथील झालेल्या ग्रामपंचायत च्या निवडणुकीत प्रथमच ग्रामपंचायत च्या इतिहासात पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच पदी सौ. वैशाली जितेंद्र महाजन यांना संधी मिळाली आहे. याबाबत असे ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण १६५३ पैकी १४३६ मतदान झाले.मतदान होऊन लोकनियुक्त महिला सरपंच पदासाठी सौ. वैशाली जितेंद्र महाजन व सौ. सुवर्णा नितिन पाटील यांची लढत होऊन यात सौ .वैशाली महाजन यांना ७२६ मते मिळाली तर सौ. सुवर्णा पाटील यांना ६८५ मते मिळाली. यात ४१ मते सौ.वैशाली महाजन यांना जास्त मिळाल्याने त्या लोकनियुक्त सरपंच पदी निवडून आल्या.
तसेच वार्ड क्रमांक १ मधून कैलास तायडे यांना २०६ मते,तर मनोहर गायकवाड १८९ मते मिळाल्याने कैलास तायडे हे विजयी झाले.वार्ड क्रमांक २ मधून जितेंद्र महाजन यांना ४१५ मते, गजानन पाटील यांना १५० मते मिळाल्याने जितेंद्र महाजन हे विजयी झाले आहे.

याच वार्डातुन साजिदाबी शेख अय्यास यांना ३३९ मते तर सौ रुपाली पाटील यांना २१८ मते मिळाल्याने साजिदाबी शेख अय्यास या विजयी झाल्या .तर माघारी दिवशी च सहा सदस्य बिनविरोध निवडून आले असून यात संजय वाघ,सौ. योगिता तायडे, सौ संगीता ठाकरे, सौ.आशाबाई तायडे, ग भा. गंगुबाई पवार,मधुकर पाटील हे बिनविरोध निवडून आले.एकूण नोटा मतदान ७२ झाले आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार