सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत वाढत्या गर्दीवर नियंत्रण व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी शहरात स्वतंत्र जादा कुमक दाखल–डीवायएसपी संजय सातव

Spread the love

शिर्डी ( प्रतिनिधी)आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीच्या श्री साईबाबांच्या दर्शनाला सलग सुट्ट्यांमुळे व नातळच्या सुट्ट्यांमुळे साई भक्तांची मोठी गर्दी होत असून या गर्दीचे नियोजन सुव्यवस्थित व्हावे व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने मोठी दक्षता घेत येथे पोलिस कुमक वाढविण्यात आली आहे.शिर्डीला श्री साईबाबांचे दर्शनाला देश-विदेशात साईभक्त येत असतात. शिर्डी हे प्रसिद्ध तीर्थस्थान झाले असून येथे साईभक्तांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर दिवसेंदिवस मोठी गर्दी वाढत आहे. त्यात 25 डिसेंबर ,नाताळ सुट्ट्या, नवीन वर्षाचे स्वागत ,यामुळे शिर्डीमध्ये साई भक्तांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हा पोलिस प्रशासन व पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशान्वये शहरासाठी पोलीस कुमक वाढवण्यात आली असून एक पोलीस निरीक्षक,10 पोलीस उपनिरीक्षक ,27 महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह 95 पोलीस कर्मचारी शिर्डी साठी स्वतंत्रपणे देण्यात आले असून शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांच्या गर्दीमुळे येथे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये .तसेच गर्दीमुळे येथील पाकीटमारी चेंन स्नेकिंग,छोट्या मोठ्या चोर्‍या, ह्या होऊ नये यासाठी येथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच 27 डिसेंबर नंतर आणखी पोलीस दलाची कुमक येथे दाखल होणार आहे. कोरोनाच्या अटी व शर्तींचे पालन व्हावे. नागरिकांनी साईभक्तांनी मास्क वापरावे. सुरक्षित सामाजिक अंतर ठेवावे. विनाकारण गर्दी करु नये. कोरोणा प्रतिबंधक लसीचे दोन डोस द्यावे. त्याचे प्रमाणपत्र जवळ असावे.जर कायदा किंवा कोरोनाचे अटी व शर्तींचे कोणी उल्लंघन केले तर दंड तसेच कारवाई करण्यात येईल .असा इशाराही शिर्डीचे पोलिस उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

टीम झुंजार