प्रतिनिधी एरंडोल
पळासदळ शिवारसह तालुक्यातील शेतशिवारात विजेचा कमालीचा लपंडाव हा सध्या सुरू आहे. त्यामुळे शेतकरी हा परेशान झाला असून रब्बी हंगाम विजे आभावी व पाण्याअभावी धोक्यात आला आहे.परिणामी शेतशिवारातील ठरलेला वीज पुरवठा हा नियमित देण्यात यावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. यावर्षी तालुक्यात पर्जन्यवृष्टी ही चांगली झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगाम हा जोमात आहे. शेतकऱ्यांनी शक्य तेवढा शेती शिवार ही पेरून उत्पादन घेण्याचे तयारी चालवली आहे. महागडे बियाणे, खते व औषधे वर पैसे खर्च करून शेतकरी आपल्या पिकांना पाणी भरीत आहे. परंतु ठरलेला वेळा वर देखील वीज पुरवठा हा सुरळीत दिला जात नसल्याने शेतकरी हा कमालीचा संतप्त झाला आहे तालुक्यातील कासोदा पिडर अंतर्गत पळासदळ शिवारात हा विजेचा लपंडाव सर्वाधिक होत असल्याने या भागातील शेतकरी हा अतिशय त्रस झाले आहेत.
दिवसाच्या वेळेत दहा ते पंधरा मिनिटात वीज ही ये-जा करीत असल्याने शेतकऱ्यांचा एक दिवसाचा भरणा हा चार चार दिवसावर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गहू, मका आदी पिके हे निसण्याचा या मार्गावर आहेत. त्यांना वेळेवर पाणी न मिळाल्यास या पिकांच्या उत्पादनावर कमालीचा परिणाम होणार आहे. परिणामी संभाव्य शेतकऱ्यांचं नुकसान पाहता आमदार चिमणराव पाटील यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालून वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी व वायरमन यांना सूचना दोन शेतकर्यांना नियमित वीज पुरवठा मिळवून देण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.