जैन मंदिरातील दोन किलो सोन्याची मूर्ती बदलली; ‘असा’ झाला घटनेचा उलघडा

Spread the love

औरंगाबाद :- सघ्या महाराष्ट्रात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच औरंगाबादच्या (Aurangabad) कचनेर येथील श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातून तब्बल दोन किलो वजनाची सोन्याची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी बदलली असल्याची घटना उघडकीस आली आहे आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक यांनी भेट देऊन तपासाचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी गाभाऱ्यातून दोन किलो वजनाची सोन्याची मूर्ती लंपास केली आणि त्याजागी पंचधातूची दुसरी दिसणारी मूर्ती बसविली. मात्र, या चोरट्यांनी मूर्तीची अदलाबदली नेमकी कशी आणि केव्हा केली याबाबाद कुणालाही माहित नाही.

मात्र काल मूर्तीच्या पायाजवळचा भाग पांढरा पडत चालल्याचे लक्षात आले. त्यातून त्यांनी मूर्ती बदलली गेल्याचा संशय व्यक्त केला आणि त्यानंतर मूर्तीचे परीक्षण करण्यात आले. तेव्हा या मूर्तीचे वजन करण्यात आले. खोटी मूर्ती 1 किलो 66 ग्राम भरली, तर मूळ सोन्याची मूर्ती दोन किलो 300 ग्राम वजनाची आहे.

त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. मूळ सोन्याची मूर्ती बदलून त्याजागी हुबेहूब दिसणारी मूर्ती बसवण्यात आल्याने मूर्ती बदलल्याचे कुणाच्याच लक्षात आले नाही. पोलिसांकडून मंदिरातील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांसमोर आता मूळ सोन्याची मूर्ती शोधण्याचे आवाहन असणार आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार