झुंजार l प्रतिनिधी
पारोळा :- शहरातील राष्ट्रीय महामार्ग सहा वरील सत्यनारायण मंदिर समोरील एका कपाशी खरेदी दुकानाच्या ठिकाणी नाशिक व जळगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पहाटे बनावट दारू बनवणारा अड्ड्यावर धाड टाकून एक कोटी,६४ हजार,१६२ रुपयांचा मुद्देमालासह १७ संशयतांना ताब्यात घेतले असून ५ संशयित फरार आहेत या संदर्भात पारोळा पोलिसात कुठलीही नोंद नसून पोलीस निरीक्षकसह पोलीस स्टेशन अनभिज्ञ असल्याचे दर्शवित आहे. पारोळा शहराच्या तालुक्यात अवैध धंदे हे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. बनावट दारूचे शहरासह तालुक्यात मोठे जाळे आहे.
त्याच अनुषंगाने महामार्ग सहा गट नंबर १८१ मधील प्लॉट नं १,२,व ३ मधील एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या कापूस खरेदी ठिकाणा वरील एका गोदामात बनावट देशी दारू बनवण्याचा कारखाना हा सुरू होता. याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यावरून नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षक दर्जाचा अधिकारी, कर्मचारी व जळगाव राज्य उत्पादन शुल्काचे पथक यांनी सहयुक्त रित्या पहाटे धाड टाकली धाडीत देशी बनावट मद्य बनवत असताना काही मजूर रंगेहात मिळून आले आहेत. पथकाने त्यांच्यासह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत कारवाई ही सुरू होती. मात्र या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी देऊन अनभिज्ञता व्यक्त केली आहे. दरम्यान हे कापूस विक्री दुकान हे एका सरपंच तथा शहरातील माजी नगरसेविका पती चे असून त्या ठिकाणी ही कारवाई झाल्याने शहरासह तालुक्यात एकच चर्चा रंगत आहे. शहरा पासून अवघ्या अर्धा किमीच्या अंतरावर एवढ्या मोठयस प्रमाणात विदेशी मद्याचा कारखाना सुरू असताना स्थानिक पोलीस, डी बी पथक तसेच अंमळनेर व चाळीसगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी सोयीने अनभिज्ञ असल्याची शहरासह तालुक्यात चर्चा होत आहे. या प्रकरणी अधिकृत माहिती मात्र राज्य उत्पादन शुल्काराच्या विभागाकडून उशिरा पर्यंत मिळाली नाही.
अटक करण्यात आलेले संशयित १) महेश संभाजी पाटील २) सुदामगिर भूरागीर गोसावी ३) प्रेमसिंह रतन जाधव ४) नरेंद्र मधुकर पाटील ५) राजू रतन जाधव ६) प्रदीप इस्मल पावरा ७) दीपक गुलाब पावरा ८) रंजीत निंबा पावरा ९) प्रताप चंदरसिंग पावरा १०) सतीश अबला पावरा ११) राकेश कंदरसिंग पावरा १२) प्रंकाश बदा पावरा १३) दयाराम नहालसिंग बारेला १४) रामगिरी भुरागीर गोसावी १५) भीमसिंग बदा चव्हाण १६) सुरेश श्रावण राठोड १७) निलेश नुरर्जी पावरा या संशयित आरोपींना अटक केली असून तर १) समाधान लोचन चौधरी २) सुधाकर भास्कर पाटील ३) प्रदीप आनंदा पवार ४) राहुल अहिरराव ५) अण्णा पाटील हे संशयित फरार आहेत.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
१) एम एच 18 एम 3837 क्रमांकाची 10 चाकी टाटा कंपनीची ट्रक,२) एम एच 18 बी जी 9823 क्रमांकाची आयशर ट्रक,३) 9 मोबाईल संच,४) 5000 लिटर स्पिरिट (मध्यार्क) ५) 1700 लिटर अवैध बनावट देशी मद्य सदृश्य द्रावण ६) 9432 लिटर देशी मद्य
यांनी केली कार्यवाही
सदरची कारवाई डॉ. विजय सूर्यवंशी, श्री सुनील चव्हाण, श्री अर्जुन ओहोळ, जितेंद्र गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक श्री ए एस चव्हाण, दुय्यम निरीक्षक दुय्यम व्ही एम पाटील, श्री अ. गो. सराफ, जवान सर्वश्री गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड, युवराज रतवेकर, तसेच कारवाई करिता ए वाय श्रीवास्तव श्री सी एच पाटील,श्री दिंडकर,श्री पी बी अहिरराव यांनी मदत केली
या गुन्ह्याचा तपास ए.एस चव्हाण निरीक्षक विभागीय भरारी पथक नाशिक हे करीत आहे.
राज्य उत्पादक नासिक यांच्यातर्फे नागरिकांसाठी आव्हान
अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक 18002339999 व्हाट्सअप क्रमांक 8422001133 तसेच दूरध्वनी क्रमांक0253-2319744 यावर संपर्क करावा.