धरणगाव येथे प्रभाग क्र.2 मध्ये शिवसेना महिला आघाडी तर्फे हळदीकुंकू सोहळा संपन्न.

Spread the love

विचारांची देवाणघेवाण करून एकमेकांना आधार देणे हेच खरे महिलांचे महिलांसाठी सौभाग्याच लेणं असतं…!

मा.सौ.उषाताई गुलाबरावजी वाघ
मा.नगराध्यक्षा.ध.न.पा

धरणगाव शहर प्रतिनिधी योगेश पाटील


धरणगाव प्रतिनिधी:- शहरातील प्रभाग क्र.2 म्हणजेच संजय नगर भागात नगरसेवक मा.श्री.सुरेश भास्कर महाजन व मित्र परिवार आयोजित तथा शिवसेना महिला आघाडी पुरस्कृत हळदीकुंकू सोहळ्याचे स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने आयोजन करण्यात आले होते.


तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.उषाताई गुलाबरावजी वाघ व प्रमुख अतिथी म्हणून मा.लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पाताई महाजन, मा.उपनगराध्यक्षा सौ.सुरेखाताई महाजन,मा.उपनगराध्यक्षा.सौ.कल्पनाताई महाजन,सौ.अंजलीताई विसावे,सौ.किर्तीताई मराठे,सौ.रत्नाताई धनगर,सौ.हेमांगी अग्निहोत्री युवती सेनेच्या स्नेहा प्रकाश पाटील उपस्थित होत्या.स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.


त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ.उषाताई वाघ महिलांना आपल्या संदेशात म्हणाल्या की आज स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती तसेच भारतामध्ये स्वतंत्र सेना निर्माण करणारे नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती असून यानिमित्ताने आपण जो हळदी कुंकवाचा छोटेखानी कार्यक्रम घेतलेला आहे तो म्हणजे एक कार्यक्रम नसून या कार्यक्रमातून आपल्याला यातून काहीतरी बोध घ्यायचा आहे. महिलांनी अशाच कार्यक्रमांमध्ये एकत्र येत आपल्या विचारांचे आदान प्रदान करून समाजात निर्माण होणाऱ्या ज्या व्यासंगी व अप्रिय घटना असतात यांना आळा घालण्यासाठी एकत्र येत नारीशक्ती ची एक जूट दाखवून द्यावी.

कारण *हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा हे सांगितले होते की रडायचं नाही लढायचं* आणि या उद्देशाने महिलांनी सुद्धा सक्षमपणे आपले कार्य करीत एकत्रित यावे असे प्रतिपादन यावेळी सौ.उषाताई वाघ यांनी केले.कार्यक्रमाच्या या मंगलमय सोहळ्यास वेळात वेळ काढून जळगाव लोकसभा सह संपर्क प्रमुख मा.गुलाबरावजी वाघ यांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला.मा.नगरसेवक श्री. सुरेश भास्कर महाजन व मित्र परिवार संजयनगर आयोजित हळदीकुंकू सोहळ्यात प्रमुख अतिथींच्या हस्थे भेट वस्तू वाटप करण्यात आल्या.


या प्रसंगी अशाबाई सुरेश महाजन, मीराबाई महाजन, कल्पना महाजन,शोभा महाजन, वैशाली रामकृष्ण महाजन,शीतल महाजन,भारती चौधरी, वैशाली विनोद महाजन,कावेरी महाजन,ज्योती फराटे,गायत्री देशमुख यांनी महिलांना हळदीकुंकू व सौभाग्याचे प्रतीक म्हणून भेट वस्तू दिल्या.
त्याच प्रमाणे कार्यक्रम यशस्विते साठी संजय नगर स्थित जेष्ट वरिष्ठ शिवसैनिक सुद्धा या प्रसंगी उपस्थित होते. यात कृपाराम महाजन, विजय महाजन, बापू महाजन, रामकृष्ण महाजन,बापू चौधरी, भाया भाऊ, समाधान महाजन, गणेश महाजन, भय्यामामा महाजन, गोपाल महाजन, सुनील फराटे, मचिंद्र पाटील, अनिल फराटे इ..बहुसंख्येने शिवसैनिक व कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित राहुन अनमोल सहकार्य करीत कार्यक्रम स्मपन्न करण्यात आला.

टीम झुंजार