पारोळा – दि.२४ डिसेंबर २०२२ रोजी पारोळा नगरपरिषद हद्दीतील धुळे-नागपुर महामार्गालगत असलेल्या गट नं. १८१ मधील प्लाॕट नं. १,२ व ३ या मिळकती असलेल्या पत्र्याचा गोडावुन मध्ये राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभागाच्या पथकाने छापा टाकुन बनावट दारू तयार करण्याचा कारखाना नष्ट करण्यात आला असुन यात १ कोटी ६४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मध्ये मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आलेले देशी मद्य व मद्य तयार करण्याचे रसायने, साहीत्य, मशनरी व वाहतुकीची वाहने यांचा समावेश आहे.
सदरची कारवाई ही अत्यंत मोठ्या स्वरूपाची कारवाई समजली जात आहे. सदरच्या कारवाईत जप्त करण्यात आलेला दारू साठा, रसायने पाहता सदर कारखाना बऱ्याच दिवसांपासुन सुरू असल्याबाबतची जोरदार चर्चा समाज माध्यमांतुन ऐकण्या येत आहे. असे असतांना स्थानिक प्रशासन अनभिज्ञ असल्याबाबतचा आव आणत आहे.जणू आमचा याच्याशी काहीही संबंध नाही . सदर बनावट दारू निर्मिती संदर्भात सामान्य जनमानसात चर्चा असतांना वरील सर्व कारभार मुक संमातीने सुरू होता व त्यामुळे समाजात चीड आणि सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
दैनंदिन देखील वाढते चोरी सत्र, अवैध धंदे यांचेवर कुठलीही ठोस कारवाई करतांना स्थानिक प्रशासन दिसत नसल्याने जनतेकडून असंतोष व्यक्त केला जात आहे.
सदर प्रकरणी स्थानिक प्रशासनाची कसुन चौकशी करण्यात यावी व स्थानिक प्रशासनातील जबाबदार दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस व राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराजजी देसाई यांचेकडे केलेली आहे.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.