७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एरंडोल नगरपालिका येथे ध्वजारोहण.

Spread the love

एरंडोल नगरपालिका एरंडोल
जि.जळगांव

          प्रेस नोट   

     दि.२६/०१/२०२२ रोजी सकाळी ८.२० मि. एरंडोल नगरपालिका स्तरावर ७२ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर ध्वजारोहण प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.विकास नवाळे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी माजी/आजी माजी सैनिक श्री.कृष्णा

श्री कृष्णा नारायण महाजन, श्री. रघुनाथ पाडूरंग सुतार,न.पा.सफाई कामगार श्री.राजेश रतन गोंडाले श्री. शाम बचू गेचंद, माजी सन्मा.नगरसेवक/ नगरसेविका सौ.जयश्री पाटील, सी.सुरेखा चौधरी, श्री.योगेश देवरे, श्री.कृणाल महाजन व कार्यायल अधिक्षक श्री.हितेश जोगी, डॉ.योगेश सुकटे, डॉ.अजित भट्ट, महेंद्र पाटील, विकास पंचबुध्दे, सौरभ बागड, देवेंद्र शिंदे, विवेक कोळी, विनोद पाटील, भूषण महाजन, अनिल महाजन,प्रियंक जैनआदीसह अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.

माजी सैनिकांचा विशेष सत्कार

ध्वजारोहणांचा कार्यक्रम झाल्यानंतर एरंडोल शहरातील आजी/माजी सैनिकांचा यांचा प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.विकास नवाळे यांच्या हस्ते वृक्ष रोप व शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर माझी वसुंधरा अभियान २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत दि.२३ ते २६ जानेवारी २०२२ या कालावधीत अंजनी नदी स्वच्छता मोहिमेत स्वयंप्रेरणेने सहभागी झालेल्या शहरातील सेवाभावी/सामाजिक संस्था यात बजरंग दल, स्वामी विवेकानंद केंद्र, विश्व हिंदू परिषद स्वामी विवेकानंद केंद्र, योगेश्वरी पंतसंस्था,भाजपा युवा शाखा यांचे प्रतिनिधी, कुलस्वामिनी बचत गट, एरंडोल प्रतिनिधी मोनिका विजय पाटील,गिता विठ्ठल शिंपी माझी वसुंधरा अभियानांतर्गत जास्तीत जास्त E Pledge घेतलेल्या कर्मचारी/ नागरीक यांचा सत्कार डॉ.योगेश सुकटे, सोनी मांगीलाल ठाकरे सौ. कुसुम देविदास पाटील श्री.महेंद्र निंबा पाटील माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्ष गणना श्री.राहुल मनोज लोहार घनकचरा डेपो वृक्ष संगोपन श्री.युवराज कौतिक सोनवणे यांना सन्मान पत्र व वृक्ष रोप देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमचे सूत्रसंचालन डॉ.योगेश सुकटे यांनी केले.

टीम झुंजार